कॅनडाकडून आणखी एक प्रक्षोभक पाऊल
चीन-उत्तर कोरिया असलेल्या श्रेणीत केला समावेश
वृत्तसंस्था/ ओटावा
कॅनडाने भारतावर आणखी एक मोठा आरोप केला आहे. यामुळे दोन्ही देशांदरम्यान पूर्वीच तणावपूर्ण असलेले संबंध अधिकच बिघडण्याची शक्यता आहे. शीख फुरिटवादी समूह आणि सरकारी नेटवर्कना लक्ष्य करण्यासाठी भारत सायबर-टेकचा वापर करत असल्याचा आरोप कॅनडाने केला आहे. ज्या देशांच्या सायबर अटॅकपासून धोका निर्माण होऊ शकतो अशा देशांच्या यादीत कॅनडाने भारताचा समावेश केला आहे.
कॅनडाच्या सायबर अटॅकशी संबंधित नव्या आरोपांमुळे दोन्ही देशांदरम्यान राजनयिक आणि सुरक्षा वादांची तीव्रता वाढणार आहे. कॅनडाची गुप्तचर यंत्रणा सीएसईने 2025-26 साठी स्वत:च्या नॅशनल सायबर थ्रेट असेसमेंट रिपोर्टमध्ये भारताल चीन, रशिया, इराण आणि उत्तर कोरियासारख्या देशांच्या यादीत सामील केले आहे. याचा अर्थ या देशांकडून सायबर हल्ले होण्याचा धोका कॅनडाला आहे.
अहवालात काय?
विदेशात खलिस्तानी घटक आणि स्वत:च्या विरोधकांवर नजर ठेवण्यासाठी भारत स्वत:च्या सायबर क्षमतांचा वापर करत असल्याचा आरोप अहवालात करण्यात आला आहे. भारत खलिस्तानी फुटिरवादी आणि विदेशात राहणाऱ्या अन्य विरोधकांवर नजर ठेवणे आणि ट्रॅकिंगसाठी सायबर टेकचा वापर करत असल्याचे सीएसईने स्वत:च्या अहवालात म्हटले गेले आहे.
खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंह निज्जरच्या हत्येत भारताचा सहभाग असल्याचा आरोप कॅनडाच्या सरकारने केला होता. त्यानंतर एक भारत समर्थक हॅक्टिविस्ट ग्रूपने कॅनेडियन वेबसाइट्सच्या विरोधात ड्रिस्ट्रीब्यूटेड डिनायल ऑफ सर्व्हिस अटॅक सुरू केल्याचा दावा सीएसईने केला आहे.