Satara Politics | सातारा जिल्हा परिषदेत पुन्हा राजकीय 'ट्विस्ट'! सभापती भाजपचाच होणार; जयकुमार गोरेंचा शड्डू
४ एप्रिलला सातारा जिल्हा परिषदेत नवा राजकीय धमाका होणार?
सातारा - सातारा जिल्हा परिषद राजकारणात पुन्हा एकदा मोठा पॉलिटिकल ट्विस्ट पाहायला मिळत आहे. जिल्हा परिषद अध्यक्ष उपाध्यक्ष पदाच्या निवडी दरम्यान झालेला राजकीय महायुतीतच राडा संपूर्ण महाराष्ट्राने बघितला त्याचे पडसाद विधान परिषदेचे सभागृहात म्हटले अनेक राजकीय दरी माहितीच पडल्या त्या अध्यापही भरल्या नसतानाचग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी पुन्हा एकदा ठाम भूमिका घेत,“सातारा जिल्हा परिषदेत सभापती भाजपचाच होणार,” असा जोरदार दावा केला आहे.
विशेष म्हणजे, अध्यक्ष निवडणुकीवेळी बहुमत नसतानाही दिलेला शब्द खरा करून दाखवलेल्या जयकुमार गोरेंनी आता विषय समित्यांच्या सभापतिपदासाठीही तसाच आत्मविश्वास दाखवला आहे.येत्या ४ एप्रिल रोजी सातारा जिल्हा परिषदेत विषय समित्यांच्या सभापतींची निवड होत असून,या पार्श्वभूमीवर गोरेंच्या वक्तव्यामुळे जिल्ह्यातील राजकीय वातावरण पुन्हा तापले आहे.
दुसरीकडे, शिवसेनेचे नेते आणि पालकमंत्री शंभूराज देसाईतसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री मकरंद पाटीलयांच्या रणनीतीकडे आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे“महायुती म्हणून सर्वांनी एकत्र यावे, ही आमची भूमिका आहे;पण भाजपचाच सभापती व्हावा, ही माझी ठाम भावना आहे,”असे स्पष्ट वक्तव्य करत जयकुमार गोरेंनी पुन्हा एकदा राजकीय पटावर नवी चाल टाकली आहे.
अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडणुकीवेळी दिलेला शब्द पूर्ण करून दाखवलेल्या गोरेंची ही नवी घोषणाआता विरोधकांसाठी मोठे आव्हान ठरणार का,की शंभूराज देसाई आणि मकरंद पाटील नवी रणनीती आखत राजकीय समीकरणे बदलणार,याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
४ एप्रिलला होणारी सभापती निवडणूक
सातारा जिल्हा परिषदेत नवा राजकीय इतिहास घडवणार का…?की पुन्हा एकदा जयकुमार गोरेंची चाल सर्वांवर भारी पडणार…? याच प्रश्नांची उत्तरे आता येत्या काही दिवसांत मिळणार आहेत.