सांगे ‘अंबरग्रीस’ तस्करीप्रकरणी मुंबईतून आणखी एकास अटक
सांगे : सांगे पोलिसांनी गेल्या गुऊवारी रात्री छापा टाकून पकडलेल्या अंबरग्रीस (व्हेल माशाची उलटी) तस्करीप्रकरणी आणखी एकास अटक करण्यात आली असून असून त्याचे नाव सचिन म्हात्रे (मुंबई) असे आहे. यापूर्वी तिघांना अटक करून त्यांना चार दिवसांचा रिमांड घेण्यात आला होता. सांगेच्या शेळपे औद्योगिक वसाहतीजवळ दाबामळ येथे पकडलेल्या तब्बल 10 कोटी ऊपयांच्या 5.7 किलो अंबरग्रीसप्रकरणी योग्य दिशेने तपास चालू असून पोलिसांच्या हाती महत्त्वाचे धागेदोरे लागले आहेत, असे सांगे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. सांगे पोलिसाचे एक पथक गोव्याबाहेर रवाना झाले होते. मिळालेल्या सुगाव्याच्या आधारे सदर पथकाने मुंबई येथे म्हात्रे याला अटक करून पथक गोव्यात दखल झाले आहे. पोलिसांना अनेक धागेदोरे मिळाले असून त्याअनुषंगाने तपास चालू आहे. या प्रकरणी सौद्यासाठी सांगेची निवड का करण्यात आली हा प्रश्न पुढे आला आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कोट्यावधी ऊपयाची किंमत असलेले हे महागडे अंबरग्रीस भारतात बाळगणे, त्याचा व्यापार किंवा विक्री करणे हे बेकायदेशीर आहे. या प्रकरणी यापूर्वीच रातुकांत कारापूरकर, झुआरीनगर, साईनाथ शेट, फोंडा आणि वेगेश रेडकर, सावंतवाडी या तीन संशयित आरोपीना अटक केली आहे. तसेच सांगे पोलिसांनी वन्यजीव संरक्षण कायद्याच्या अंतर्गत गुन्हा नोंद केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सदर अंबरग्रीस मोटरसायकलने प्रथम वास्को येथे आणण्यात आले. त्याला देखील याची किंमत 10 कोटीच्या घरात आहे याची कल्पना नव्हती. त्यानंतर वरील तिन्ही संशयित सांगे येथील औद्योगिक वसाहत असलेल्या ठिकाणी सौदा करण्यासाठी आले. ते ज्या गाड्यांतून आले होते त्या दोन गाड्या पोलिसांनी जप्त केल्या आहेत. अटक केलेल्या सचिन म्हात्रे याला न्यायालयासमोर रिमांडसाठी हजर केले जाईल, असे पोलिस निरीक्षक दितेंद्र नाईक यांनी सांगितले