‘लोकमान्य’च्या यशस्वी प्रवासात आणखी एक मानाचा तुरा!
महिला सक्षमीकरणासाठी घेतला पुढाकार : नाशिकमधून मायक्रो लोन सेवेला सुरुवात
नाशिक : लोकमान्य मल्टीपर्पज को-ऑप. सोसायटी लिमिटेड आपल्या गुंतवणूकदारांना पारंपरिक गुंतवणूक सेवा देत असतानाच कर्जे, विमा आणि म्युच्युअल फंड याही सेवा देते. आता आणखीन एक पुढचे पाऊल टाकत मायक्रो लोन (सूक्ष्म कर्ज) सेवा ही सेवादेखील सुरू करण्यात आली आहे. या सेवेचा शुभारंभ बेळगाव येथील कॉर्पोरेट कार्यालय आणि नाशिक येथील प्रादेशिक कार्यालयात करण्यात आला. पहिल्या टप्प्यात 21 महिलांना सुमारे 10 लाख ऊपयांचे कर्ज वाटप करण्यात आले आहे. हे कर्ज शहर आणि ग्रामीण भागातील वेगवेगळ्या महिला बचत गटांना देण्यात आले आहे. मायक्रो लोन ही सेवा लोकमान्यकडून वैयक्तिक आणि समूह अशा दोन प्रकारात दिली जाणार आहे. या कार्यक्रमाला उपाध्यक्ष अजित गरगट्टी, संचालक गजानन धामणेकर, पंढरी परब, विठ्ठल प्रभू, मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित दीक्षित उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान कर्ज विभाग प्रमुख नागेश नलावडे, सुरेशकुमार गुरुसिंघानी, गौरव ओबेरॉय, हरी पाटील यांनी स्वयं-साहाय्य गटांना मार्गदर्शन केले. जनसंपर्क अधिकारी राजू नाईक आणि श्रीमती मेघा वैद्य यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
ही तर स्वप्नपूर्ती ...
अनेक वर्षांपासून सामाजिक जीवनात वावरताना एक गोष्ट नेहमीच दिसते की कुठलाही सुजाण समाज निर्माण करायचा असेल तर सर्वात आधी महिलांचे आर्थिक सक्षमीकरण गरजेचे आहे. त्यामुळेच लोकमान्यमध्ये नेहमीच महिलांना पुढाकार दिला जातो. हीच गोष्ट आणखीन पुढे नेत आता आम्ही थेट महिलांना रोजगार निर्मितीसाठी मायक्रो लोन देत आहोत. या माध्यमातून आम्ही महिलांना रोजगार निर्मिती करत त्यांच्या सक्षमीकरणासाठी पुढाकार घेतला आहे.
-डॉ. किरण ठाकुर, लोकमान्यचे संस्थापक व तरुण भारतचे समूहप्रमुख व सल्लागार संपादक
महिला रोजगार निर्मितीला प्रोत्साहन देणार
“आम्ही मायक्रो लोन देण्यासाठी केलेली सुरुवात ही आमच्या संस्थेसाठी एक महत्त्वाचा टप्पा आहे. या माध्यमातून आम्ही महिलांमध्ये उद्योजकता वाढीस प्रोत्साहन देत आहोत. सोबतच त्यांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनविण्याचा आमचा प्रयत्न आहे.
-अभिजित दीक्षित, मुख्य कार्यकारी अधिकारी