आणखी एक जवान गुलमर्ग हल्ल्यात हुतात्मा
लष्कराच्या वाहनावर दहशतवाद्यांनी केला होता गोळीबार
► वृत्तसंस्था/ श्रीनगर
जम्मू-काश्मीरमधील बारामुल्ला येथील गुलमर्ग भागात गुऊवारी रात्री झालेल्या दहशतवादी हल्ल्यात आणखी एक जवान हुतात्मा झाला आहे. नागीन भागात एलओसीजवळ दहशतवाद्यांनी लष्कराच्या वाहनावर हल्ला केला होता. यामध्ये गुऊवारीच 2 सैनिक आणि 2 कुलींना प्राण गमवावे लागले होते. तसेच अन्य तीन जखमी जवानांना श्रीनगरच्या 92 बेस हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. या जखमींपैकी एका जवानाने शुक्रवारी सकाळी अखेरचा श्वास घेतला. रायफलमॅन कैसर अहमद शाह आणि रायफलमॅन जीवन सिंह अशी गुऊवारी हुतात्मा झालेल्या जवानांची नावे आहेत. शुक्रवारी हुतात्मा झालेल्या तिसऱ्या सैनिकाबाबतचा तपशील समोर आलेला नाही.
नागीन सेक्टरमध्ये लष्करी वाहनावर झालेल्या हल्ल्यात 50 हून अधिक दहशतवादी सामील असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. उत्तर काश्मीरमधील बोटा पाथरी सेक्टरमध्ये एलओसीवरून दहशतवाद्यांनी घुसखोरी केली असावी, असा अंदाज आहे. हल्ला आणि गोळीबारानंतर या परिसराला सुरक्षा दलांनी वेढा घातला आहे. शुक्रवारी सकाळीही शोधमोहीम सुरूच होती.