For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

निज्जर हत्येप्रकरणी आणखी एका भारतीयाला अटक

06:08 AM May 13, 2024 IST | Tarun Bharat Portal
निज्जर हत्येप्रकरणी आणखी एका भारतीयाला अटक
Advertisement

कॅनडात पोलिसांकडून कारवाई : खलिस्तानी दहशतवाद्याची झाली होती हत्या

Advertisement

वृत्तसंस्था/ ओटावा

खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंह निज्जरच्या हत्येप्रकरणी कॅनडा पोलिसांनी आणखी एका भारतीय नागरिकाला अटक केली आहे. कॅनडाच्या ब्रिटिश कोलंबियाच्या पोलिसांनी यासंबंधी माहिती दिली आहे. यापूर्वी रॉयल कॅनेडियन पोलिसांनी तीन भारतीयांना अटक केली होती. निज्जरच्या हत्येत सामील कथित हिट स्क्वाडचे ते सदस्य होते असा दावा करण्यात आला होता.

Advertisement

चौथ्या आरोपीचे नाव अमनदीप सिंह (वय 22) असल्याचे स्थानिक पोलिसांकडून सांगण्यात आले. आरोपी शस्त्र बाळगल्याप्रकरणी यापूर्वीच ओंटारिया पोलिसांच्या ताब्यात होता. अमनदीप सिंह विरोधात हत्या आणि हत्येच्या कटाचा आरोप ठेवण्यासाठी पुरेसे पुरावे जमविले आहेत. निज्जरच्या हत्येत भूमिका बजावणाऱ्या व्यक्तींना जबाबदार ठरविण्यासाठी सुरू असलेल्या आमच्या तपासाची दिशा यातून स्पष्ट हेते असे पोलिसांनी नमूद केले आहे.

मागील आठवड्यात कॅनडाच्या रॉयल माउंट पोलिसांनी निज्जरच्या हत्येप्रकरणी करन बराड (वय 22), कमलप्रीत सिंह (वय 22) आणि करनप्रीप सिंह (वय 28) यांना अटक केली होती. तिन्ही भारतीयांवर हत्या आणि हत्येचा कट रचल्याचा आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी भारताच्या विरोधात कुठलाही पुरावा सादर करण्यात आलेला नाही, याविषयी तपास केला जात असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

Advertisement
Tags :

.