For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

दिल्लीत पुन्हा क्रौर्याची घटना

06:16 AM Jan 08, 2024 IST | Tarun Bharat Portal
दिल्लीत पुन्हा क्रौर्याची घटना
Advertisement

12 वषीय मुलीवर सामूहिक बलात्कार : चहास्टॉल मालक आणि महिलेसह 5 जणांना अटक,

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

दिल्लीत पुन्हा एकदा क्रौर्याची घटना घडल्याने खळबळ निर्माण झाली आहे. 12 वर्षांच्या मुलीवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे. ही घटना 2 जानेवारीची असून संबंधित मुलीने 5 जानेवारी रोजी आपल्या चुलत भावाला हा संपूर्ण प्रकार सांगितला. त्यानंतर याची नोंद पोलिसात झाल्यानंतर दिल्ली पोलिसांनी रविवारी, 7 जानेवारी रोजी या घटनेचा खुलासा केला. पोलिसांनी महिला आणि चहाच्या टपरीमालकासह पाच जणांना अटक केली आहे. आरोपींपैकी तीन अल्पवयीन असून ते 12, 14 आणि 15 वर्षे वयोगटातील आहेत. हे तिघेही अल्पवयीन चहाच्या टपरीवर काम करत असल्याचेही प्राथमिक चौकशीत स्पष्ट झाले आहे.

Advertisement

दिल्लीत नव्याने झालेली बलात्काराची घटना सदर बाजार भागातील आहे. 1 जानेवारी रोजी चहाच्या टपरीमालकाने नवीन वर्ष साजरे करण्यासाठी एका महिलेला मुलीची व्यवस्था करण्यास सांगितले होते. ही महिला अनेकदा त्याच्या दुकानात चहा प्यायला यायची. दुसऱ्या दिवशी ती महिला 12 वर्षांच्या रॅगपिकर मुलीला भेटली आणि तिला खुर्शीद मार्केटमधील इमारतीच्या छतावरून कचरा गोळा करण्यास सांगितले. तऊणी परिसरात पोहोचण्यापूर्वी चारही आरोपी तिथे तिची वाट पाहत होते. मुलगी तेथे पोहोचताच तिच्यावर बलात्कार करण्यात आल्याचा दावा केला  जात आहे. या घटनेबाबत कोणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकीही आरोपीने मुलीला दिली.

यानंतर मुलगी उत्तर-पश्चिम दिल्लीतील आपल्या घरी परतली आणि दोन दिवस गप्प बसली. 5 जानेवारी रोजी सदर बझार येथे ती कचरा वेचण्यासाठी गेली असता तेथे राहणाऱ्या तिच्या चुलत भावाला तिने झालेला त्रास कथन केला. तिच्या चुलत भावाने मुलीच्या पालकांना माहिती दिल्यानंतर कुटुंबीयांनी पोलीस स्थानकात धाव घेतली. तक्रार दाखल झाल्यानंतर काही तासांनी सर्व आरोपींना ताब्यात घेण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. चहाच्या स्टॉलचा मालक छत्तीसगडचा असून त्याच्या दुकानात काम करणारी तीन मुले उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशातील आहेत.

महिन्यातील बलात्काराची दुसरी घटना

या घटनेच्या 22 दिवस आधी म्हणजे 12 डिसेंबर रोजी दिल्लीतील स्वरूप नगरमध्ये 9 वर्षांच्या मुलीवर बलात्कार करून तिची हत्या केल्याची घटना समोर आली होती. 12 डिसेंबर रोजी घराबाहेर खेळत असताना मुलगी बेपत्ता झाली होती. ही मुलगी राहत असलेल्या घरातील घरमालक (52) याने ही घटना घडवून आणल्याचे पोलिसांनी सांगितले. 19 डिसेंबर रोजी आरोपीला अटक करण्यात आली होती.

Advertisement

.