For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बांगला देशात पुन्हा हिंदूची हत्या

06:30 AM Jan 07, 2026 IST | Tarun Bharat Portal
बांगला देशात पुन्हा हिंदूची हत्या
Advertisement

वृत्तसंस्था / ढाका (बांगला देश)

Advertisement

बांगला देशात आणखी एका हिंदू व्यक्तीची हत्या करण्यात आली आहे. मणी चक्रवर्ती असे त्याचे नाव असून तो किराणा मालाच्या दुकानाचा मालक होता. सोमवारी रात्री उशीरा तो त्याच्या दुकानात असताना त्याच्यावर काही अज्ञातांनी हल्ला केला. त्याच्यावर गोळीबार करुन हल्लेखोर निघून गेले. हल्लेखोर दुचाकी वाहनावरुन आले होते, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

गेल्या तीन आठवड्यांमधीही ही या देशातील हिंदूंची सहावी हत्या आहे. चक्रवर्ती हा शिबपूरचा रहिवासी होता. चारसिंदूर बझार येथे त्याचे किराणा मालाचे दुकान होते. भर बाजारात त्याची हत्या झाल्याने येथील हिंदूंमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. आपले दैनंदिन व्यवहार करतानाही आता या देशात भीती वाटत आहे, अशी प्रतिक्रिया बांगला देशातील अनेक हिंदूंकडून व्यक्त केली जात आहे.

Advertisement

हिंदू संघटनांची मागणी

चक्रवर्ती याच्या मारेकऱ्यांना त्वरित अटक करण्यात यावी, अशी मागणी बांगला देशातील हिंदू संघटनांनी केली आहे. चक्रवर्ती हे कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंधित नव्हते. एक सरळमार्गी सज्जन म्हणून त्यांचा लौकिक होता. आता अशा लोकांवरही हल्ले होत आहेत. बांगला देश आता अल्पसंख्याकांसाठी, विशेषत: हिंदू लोकांसाठी सुरक्षित राहिलेला नाही, असे मत अनेक हिंदूंनी व्यक्त केले आहे.

हत्यांचे सत्र

बांगला देशात सार्वत्रिक निवडणुकीची घोषणा झाल्यापासून हिंदूंच्या हत्यांच्या सत्राला प्रारंभ झाला आहे. आतापर्यंत सहा हिंदूंचे बळी घेण्यात आले आहेत. तर एका हिंदू महिलेवर निर्घृण बलात्कार करण्यात आला आहे. हिंदूंकडून जिझिया कर मागितला जाण्याचेही प्रकार वाढत आहेत. पोलिस अशा घटनांकडे दुर्लक्ष करीत आहेत. कित्येकदा प्रशासनाच्या पाठिंब्यानेच अशा घटना घडत आहेत. आंतरराष्ट्रीय समुदायाने बांगला देशच्या प्रशासनावर दबाव आणून त्याला हिंदू आणि इतर अल्पसंख्याकांना संरक्षण देण्यास भाग पाडावे, अशी मागणी होत आहे.

Advertisement
Tags :

.