For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आणखी एका हिंदूची बांगलादेशात हत्या

06:45 AM Sep 27, 2026 IST | Tarun Bharat Portal
आणखी एका हिंदूची बांगलादेशात हत्या
Advertisement

ड्रममध्ये आढळला व्यापाऱ्याचा मृतदेह : अल्पसंख्याक समुदाय पुन्हा निशाण्यावर

Advertisement

वृत्तसंस्था/ ढाका

बांगलादेशात हिंदू अल्पसंख्याकांवरील हल्ले अव्याहतपणे सुरू आहेत. येथील मैमनसिंग जिह्यात एका हिंदू व्यापाऱ्याच्या हत्येचे आणखी एक प्रकरण उघडकीस आले आहे. 50 वर्षीय निरंजन चंद्र यांचा मृतदेह स्लुईस गेटजवळील कालव्यात तरंगणाऱ्या एका ड्रममध्ये आढळला. निरंजन चंद्र यांच्या डोक्यावर आणि छातीवर धारदार शस्त्रांच्या खोल खुणा आढळल्या. मारेकऱ्यांनी आधी त्यांची हत्या करून नंतर मृतदेह ड्रममध्ये फेकून दिला असावा, असा पोलिसांचा विश्वास आहे. या भीषण हत्याकांडामुळे परिसरातील आणि देशभरातील अल्पसंख्याकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

Advertisement

बेगुनबारी भागातील कालव्याजवळ स्थानिक रहिवाशांना शनिवारी सकाळी पाण्यात एक ड्रम तरंगताना दिसला. संशय आल्याने गावकऱ्यांनी यासंबंधी तात्काळ पोलीस आणि प्रशासनाला माहिती दिली. पोलीस घटनास्थळी पोहोचले असता त्यांना या ड्रममध्ये एका पुरुषाचा मृतदेह दिसून आला. मृताची ओळख 50 वर्षीय निरंजन चंद्र सूत्रधार अशी पटली आहे. निरंजन चंद्र हे मैमनसिंगच्या अथरबारी बिल्डिंग परिसरात भागीदारीत दागिन्यांचे दुकान चालवत होते. त्यांच्या पॅन्टच्या खिशात मैमनसिंग हिंदू सहकारी पतसंस्थेचे एक ओळखपत्र सापडले. ओळखपत्राच्या आधारे पोलिसांनी संस्थेशी संपर्क साधून मृताची ओळख पटवली. त्यांची पत्नी सुमिता राणी सूत्रधार आणि मुलगा जॉय सूत्रधार यांनी मृतदेहाची ओळख पटवली.

पोलिसांनी अद्याप मारेकऱ्यांचा शोध घेता आलेला नाही. या प्रकरणात तूर्तास कोणालाही अटक करण्यात आलेली नव्हती. पोलीस हत्येमागील हेतू आणि मूळ कारणाचा तपास करत आहेत. या घटनेपासून पीडितेचे कुटुंब धक्क्यात असून न्यायासाठी याचना करत आहे.

अल्पसंख्याक समुदाय टार्गेटवर

बांगलादेशमध्ये हिंदू अल्पसंख्याकांवरील हिंसाचारात सातत्याने वाढ होत आहे. मोहम्मद युनूस यांच्या अंतरिम सरकारच्या काळात सुरू झालेला हा ट्रेंड बीएनपीच्या राजवटीतही सुरू आहे. अलीकडेच, अवामी लीगने 2001 ते 2006 या काळातील बीएनपी-जमातच्या राजवटीचा दाखला देत प्रश्न उपस्थित केले आहेत. बांगलादेशात मंदिरांवरील हल्ले आणि महिलांवरील लैंगिक हिंसाचाराच्या घटनाही वाढत आहेत. रंगपूर शहरातील निवृत्त शिक्षक गणपती चक्रवर्ती आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या हत्येचाही उल्लेख करण्यात आला. सरकारच्या निक्रियतेमुळे हिंदू समाजातील सदस्यांना देश सोडून जाण्यास भाग पाडले जात आहे. व्यावसायिक निरंजन चंद्र यांच्या हत्येने अल्पसंख्याकांना मिळणाऱ्या संरक्षणाचा अभाव उघड झाला आहे.

Advertisement
Tags :

.