For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पुन्हा पाटा विकेट, धावांचा पाऊस... गोलंदाज हतलबङ..

06:01 AM Apr 05, 2026 IST | Tarun Bharat Portal
पुन्हा पाटा विकेट  धावांचा पाऊस    गोलंदाज हतलबङ
Advertisement

मोदी स्टेडीयम वर आज पुन्हा धावांची बरसात होऊन 40 षटकात सव्वा चारशे धावा निघाल्या शेवटपर्यंत अटीटतीच्या झालेल्या सामन्यात राजस्थान चा 6 धावांनी विजय झाला. चांगली सुरवात होऊन देखील त्याचा फायदा गुजरात संघास उठविता आला नाही. मधली फळी सपशेल कोसळली. शेपूट वळवळल्यामुळे सामना अटीटतीचा झाला. रवी बिष्णोई ने 4 बळी मिळवत कळस चढवीला.

Advertisement

गुजरात आणी राजस्थान आयपीएल सामन्यात राजस्थान कर्णधार रियान पराग ने नाणेफेक जिंकून फलंदाजी स्वीकारली. योगायोगाने आजच्या सामन्यात भारताचे सलामीचे फलंदाज शुभमन गिल, यशस्वी जैस्वाल व भारतीय संघात प्रवेशाच्या उंबरठ्यावर असलेला वैभव सूर्यवंशी हे तिघे आपले कसब दाखवणार होते. अर्थात जास्त उत्कंठा होती वैभव च्या खेळीची..a

विशेष म्हणजे सामना गुजरात संघा विरुद्ध असूनही मोदी स्टेडीयम मध्ये राजस्थान संघाचा झेंडा घेतलेल्या प्रेक्षकांनी प्रचंड गर्दी केल्याचे पाहायला मिळाले.

Advertisement

स्टेडीयम मध्ये 45000 हजार प्रेक्षक होते याचा अर्थ फक्त एक तृतीयानश उपस्थिती आढळली.

वैभवने सिराज ला थर्ड मॅन आणी डीप बँक पॉईंट ला सणसणीत चौकार ठोकून सुरवात केली. यशस्वी जैसवाल ने देखील आक्रमक भूमिका घेतली.

पाचव्या षटकात वैभव ने अशोक शर्माला थर्ड मॅन वरून मारलेला षटकार पाहून डोळ्याचे पारणे फिटले.

या जोडीने पहिल्या पॉवर प्ले मध्ये 6 षटकात 69 धावा कुटून काढल्या.

अनुभवी रशीद खानने वैभव ला सापळ्यात पकडून डीप मिडविकेट ला 31 धावावर झेलबाद केले. त्यावेळी एकदम शांतता पसरून प्रेक्षक निराश झाल्याचे दृश्य दिसले.

वैभव मोठी खेळी करू शकला नाही तरी त्याचा दर्जा, फलंदजीचे टायमिंग, ताकद स्पष्ट दिसून आली. तथापी त्याने सुरवातीस उंच फटके मारण्यावर थोडे नियंत्रण ठेवणे फायद्याचे आहे.

यशस्वी जैस्वालने 3 षटकार 6 चौकार ठोकून 55 धावांची उपयुक्त खेळी करून आपला दर्जा दाखवून दिला. गुजरात ने निर्धारित 20 षटकात 6बाद 210 असे चांगले आव्हान ठेवले असे म्हणावे लागेल ध्रुव जुरेल ने (75) चांगली चमक दाखविली.

Advertisement
Tags :

.