आणखी एका डॉक्टरची प्रकृती चिंताजनक
कोलकात्यात उपोषणामुळे एकूण तीन डॉक्टर ऊग्णालयात
► वृत्तसंस्था/ कोलकाता
कोलकाता येथे प्रशिक्षणार्थी डॉक्टरच्या बलात्कार-हत्येच्या निषेधार्थ 5 ऑक्टोबरपासून उपोषणावर असलेल्या आणखी एका डॉक्टरची प्रकृती चिंताजनक झाली आहे. उपोषणाला बसलेल्या डॉक्टर्सपैकी डॉ. अनुस्तुप मुखर्जी यांना शनिवारी रात्री अत्यवस्थ अवस्थेत ऊग्णालयात नेण्यात आले. आतापर्यंत एकूण तिघांना रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
उपोषणकर्त्यांची प्रकृती बिघडत असली तरी सरकारने अद्याप त्यांच्या सर्व मागण्या पूर्ण केलेल्या नाहीत. जोपर्यंत सरकार आमच्या सर्व मागण्या सरकार मान्य करत नाही तोपर्यंत उपोषण सुरू ठेवण्याचा निर्णय आंदोलक डॉक्टरांनी घेतला आहे. तसेच 3 डॉक्टरांची प्रकृती बिघडण्यास राज्य सरकार जबाबदार असल्याचा आरोप संपावर बसलेल्या डॉक्टरांनी केला आहे. एकीकडे उपोषण सुरू असतानाच पश्चिम बंगालमधील कल्याणी जेएनएम ऊग्णालयाच्या 77 डॉक्टरांनी सामूहिक राजीनाम्याची धमकी दिली आहे. डॉक्टरांनी बंगाल हेल्थ युनिव्हर्सिटीच्या रजिस्ट्रारला ईमेल पाठवून 14 ऑक्टोबरपासून काम बंद आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. ज्युनियर डॉक्टरांना पाठिंबा देण्यासाठी ते राजीनामा देण्याच्या तयारीत आहेत. पश्चिम बंगाल सरकारच्या कठोर वृत्तीमुळे डॉक्टरांच्या संघटनेने नाराजी व्यक्त केली आहे. इंडियन मेडिकल असोसिएशननेही मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना पत्र लिहिले आहे. या पत्रात डॉक्टरांच्या मागण्यांवर राज्य सरकारने तातडीने कार्यवाही करावी, शांततापूर्ण वातावरण आणि सुरक्षा ही चैन नाही, असे मत या पत्रात व्यक्त करण्यात आले आहे.
8 ऑगस्टच्या रात्री आरजी कर हॉस्पिटलमध्ये एका प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली होती. 9 ऑगस्ट रोजी पीडितेचा मृतदेह मेडिकल कॉलेजमध्ये आढळून आला होता. दुसऱ्या दिवसापासून कनिष्ठ डॉक्टरांनी 42 दिवस कामबंद आंदोलन केले. राज्य सरकारने डॉक्टरांच्या मागण्या मान्य केल्या नाहीत. त्यामुळे डॉक्टरांनी 5 ऑक्टोबरच्या सायंकाळपासून उपोषण सुरू केले. या आंदोलनात 9 डॉक्टरांचा सहभाग असून आठवड्यानंतर उपोषणास्त्र सुरूच आहे.
देशव्यापी उपोषणाची ‘आयएमए’कडून हाक
कोलकात्याच्या आरजी कर मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमधील प्रशिक्षणार्थी डॉक्टरची हत्या आणि बलात्कार प्रकरणी न्यायासाठी कोलकात्यातील डॉक्टर्स उपोषणाला बसले आहेत. रविवारी नवव्या दिवशीही संप सुरूच असून आता इंडियन मेडिकल असोसिएशनने (आयएमए) देशव्यापी उपोषणाची घोषणा केली आहे. ज्युनियर डॉक्टरांना न्याय मिळवून देण्यासाठी पश्चिम बंगालमध्ये संपावर बसलेल्या डॉक्टरांच्या समर्थनार्थ ‘आयएमए’ने मंगळवार, 15 ऑक्टोबरला एक दिवशीय उपोषणाची घोषणा केली आहे.
देशभरातील ‘आयएमए’च्या अंतर्गत येणारे ज्युनियर डॉक्टर्स नेटवर्क (जेडीएन) मंगळवारी सकाळी 6 ते संध्याकाळी 6 या वेळेत उपोषण करणार आहेत. यासोबतच ‘आयएमए’ने पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना त्यांच्या मागण्या मान्य करण्याचे आवाहन केले आहे. कोलकात्यातील तऊण डॉक्टर आपल्या न्याय्य मागण्यांसाठी मृत्यूशी झुंज देत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्यांच्या संपाचा आज नववा दिवस आहे. त्यापैकी तिघांना ऊग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या आंदोलनाला जनतेचा पाठिंबा असल्यामुळे सरकारनेही त्यांच्या मागण्यांचा रितसर विचार करावा, असे आयएमएने पुन्हा एकदा म्हटले आहे.