For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

ट्रम्प यांच्यावर पुन्हा प्राणघातक हल्ला

06:45 AM Apr 27, 2026 IST | Tarun Bharat Portal
ट्रम्प यांच्यावर पुन्हा प्राणघातक हल्ला
Advertisement

► वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन डीसी

Advertisement

वॉशिंग्टनमधील प्रसिद्ध हिल्टन हॉटेलमध्ये आयोजित एका विशेष कार्यक्रमादरम्यान शनिवारी रात्री गोळीबार झाला. या घटनेवेळी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्पही उपस्थित होते. गोळीबारानंतर त्यांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले असून त्यांच्यावरील या प्राणघातक हल्ल्याने संपूर्ण अमेरिकेला पुन्हा एकदा धक्का बसला आहे. व्हाईट हाऊस कॉरस्पॉन्डंट्स डिनर दरम्यान झालेल्या अचानक गोळीबारामुळे सर्वत्र घबराट पसरली. सुरक्षा यंत्रणांनी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी जलद आणि मोठ्या दक्षतेने कारवाई केली.

या प्राणघातक हल्ल्यात डोनाल्ड ट्रम्प जखमी झाले नसल्याचे अधिकाऱ्यांनी अधिकृतपणे सांगितले आहे. तथापि, अमेरिकेच्या अध्यक्षांवर असा हल्ला होण्याची ही पहिलीच वेळ नाही. अमेरिकेच्या इतिहासात अध्यक्ष आणि माजी अध्यक्षांना अनेक वेळा प्राणघातक आणि धोकादायक हल्ल्यांचा सामना करावा लागला आहे. ही ताजी घटना अमेरिकन राजकारणातील या दीर्घकाळ चाललेल्या भीषण आणि रक्तरंजित हिंसाचाराची आठवण करून देते. ट्रम्प यांच्यावर यापूर्वी 14 जुलै रोजी पेनसिल्व्हेनियातील बटलर येथे एका निवडणूक रॅलीत हल्ला झाला होता. त्यावेळी, एका हल्लेखोराने उंचावरून झाडलेली गोळी त्यांच्या उजव्या कानाला चाटून गेली होती. या भीषण घटनेत एका निरपराध व्यक्तीचा मृत्यू झाला होता. तसेच इतर दोघे गंभीर जखमी झाले होते.

Advertisement

आता वॉशिंग्टन डीसी येथे वार्षिक ‘व्हाइट हाऊस कॉरस्पॉन्डंट्स डिनर’ दरम्यान शनिवारी रात्री गोळीबाराची घटना घडली. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, त्यांच्या पत्नी मेलानिया आणि उपराष्ट्राध्यक्ष जेडी व्हान्स यांच्यासह इतर अनेक वरिष्ठ अधिकारी शनिवारी संध्याकाळी या कार्यक्रमाला उपस्थित होते. ट्रम्प आणि पाहुणे हॉटेलच्या बॉलरूममध्ये असताना हल्लेखोराने बाहेर गोळीबार केला. हल्लेखोराला पकडण्यात आल्याचे ट्रम्प यांनी सांगितले. सुरुवातीला हल्लेखोराला गोळ्या घालण्यात आल्याचे वृत्त होते.

हल्लेखोरावर इस्पितळात उपचार

हल्लेखोराला पकडण्यात आले असून सध्या त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हल्लेखोरावर हिंसक गुह्यादरम्यान शस्त्राचा वापर करणे आणि धोकादायक शस्त्राने फेडरल अधिकाऱ्यांवर हल्ला करणे असे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आता त्याला सोमवारी फेडरल कोर्टात हजर केले जाईल, असे अमेरिकेच्या अॅटर्नी यांनी सांगितले.

गोळीबाराच्या घटनेनंतर दीड तासाने ट्रम्प यांनी माध्यमांशी संवाद साधला. ‘अमेरिकेच्या संविधानावर हल्ला झाला. सिक्रेट सर्व्हिसने माझा जीव वाचवला. सुरक्षा कर्मचाऱ्यांनी शौर्याने काम केले. ज्या अधिकाऱ्याला गोळी लागली आहे तो सुरक्षित आहे. त्याने बुलेटप्रूफ जॅकेट घातले होते. हल्लेखोराकडे एक शक्तिशाली बंदूक होती,’ अशी माहिती ट्रम्प यांनी माध्यमांना दिली.

गोळीबार करणारा इसम कॅलिफोर्नियाचा रहिवासी

बीबीसीच्या वृत्तानुसार, हल्लेखोराची ओळख अमेरिकेतील कॅलिफोर्निया येथील 31 वर्षीय कोल थॉमस अॅलन अशी पटली आहे. सार्वजनिक नोंदीनुसार, अॅलन हा अर्धवेळ शिक्षक आणि व्हिडिओ गेम डेव्हलपर होता. त्याच्या प्रोफाइलनुसार, डिसेंबर 2024 मध्ये त्याची ‘टीचर ऑफ द मंथ’ म्हणून निवड झाली होती. त्याने 2017 मध्ये कॅलिफोर्निया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून मेकॅनिकल इंजिनिअरिंगची पदवी घेतली आहे. गेल्यावर्षी त्याने कॅलिफोर्निया स्टेट युनिव्हर्सिटी, डोमिंगेझ हिल्स येथून कॉम्प्युटर सायन्समध्ये पदव्युत्तर पदवी मिळवल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

हिल्टन हॉटेलमध्येच हल्लेखोराचे वास्तव्य

अंतरिम पोलीस प्रमुख जेफ्री कॅरोल यांच्या म्हणण्यानुसार, ज्या हॉटेलमध्ये व्हाईट हाऊस कॉरस्पॉन्डंट्स डिनर आयोजित करण्यात आले होते, त्याच हॉटेलमध्ये हल्लेखोर गेस्ट म्हणून थांबला होता. हल्लेखोर ज्या खोलीत थांबला होता, त्या खोलीचीही पोलीस चौकशी करत आहेत. तपासामध्ये हल्लेखोराकडे एक शॉटगन, एक हँडगन आणि अनेक चाकू असल्याचे स्पष्ट झाले आहे.

लोकशाहीत हिंसेला स्थान नाही : नरेंद्र मोदी

भारतीय पंतप्रधान मोदींनी सोशल मीडियावर पोस्ट करून राष्ट्राध्यक्ष ट्रम्प, फर्स्ट लेडी आणि उपराष्ट्राध्यक्ष जेडी व्हान्स यांच्यासह सर्वजण सुरक्षित असल्याबाबत दिलासा व्यक्त केला. ‘लोकशाहीत हिंसाचाराला स्थान नाही आणि त्याचा अत्यंत स्पष्ट शब्दांत निषेध केला पाहिजे’ असे ट्विट ट्रम्प यांनी केले आहे.

हिल्टन हॉटेलचा इतिहास

वॉशिंग्टनचे प्रतिष्ठित हिल्टन हॉटेल त्याच्या अद्वितीय दुहेरी-कमानीच्या आकारासाठी जगभरात प्रसिद्ध आहे. या प्रतिष्ठित हॉटेलची पायाभरणी 1962 मध्ये झाली. त्यानंतर 1965 मध्ये त्याचे निर्माणकार्य पूर्ण झाले. जगभरातील अनेक प्रमुख राष्ट्राध्यक्ष, मान्यवर आणि प्रतिष्ठित नेत्यांनी या हॉटेलला सातत्याने भेट दिली आहे.

माजी राष्ट्राध्यक्ष रोनाल्ड रेगन यांच्यावरील हल्ल्याची आठवण

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष रोनाल्ड रेगन यांच्यावरही 30 मार्च 1981 रोजी हिल्टन हॉटेलच्या अगदी बाहेर गोळीबार झाला. एका महत्त्वाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्यानंतर रेगन त्यांच्या लिमोझिनमध्ये बसत असताना हा हल्ला झाला. हल्लेखोर जॉन हिंकले ज्युनियर याने रेगन आणि त्यांच्या इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या टीमवर अंदाधुंद गोळीबार केला होता. आता ट्रम्प यांच्यावरील हल्ल्यानंतर रेगन यांच्यावरील गोळीबाराच्या आठवणींना उजाळा दिला जात आ

Advertisement
Tags :

.