केरळात मंकीपॉक्सचा आणखी एक रुग्ण
वृत्तसंस्था/ कोची
केरळमध्ये मंकीपॉक्सचा आणखी एक ऊग्ण आढळला आहे. भारतातील मंकीपॉक्सची ही तिसरी घटना आहे. 29 वषीय तऊण युएईमधून केरळमधील एर्नाकुलम येथे परतला होता. त्याला खूप ताप होता. तपासणीत मंकीपॉक्सची पुष्टी झाल्याचे केरळच्या आरोग्य विभागाने सांगितले. सदर ऊग्णावर कोची येथील खासगी ऊग्णालयात उपचार सुरू आहेत. त्याचे नमुने पुण्यातील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी येथे जीनोमिक सिक्वेन्सिंगसाठी पाठवण्यात आले आहेत. तपासणीनंतर, ऊग्णाला मंकीपॉक्सच्या धोकादायक आणि वेगाने पसरणाऱ्या क्लैड-1 बी स्ट्रेनचा संसर्ग झाला आहे की नाही हे स्पष्ट होणार आहे.
भारतात 18 सप्टेंबर रोजी मंकीपॉक्सचा दुसरा ऊग्ण आणि क्लैड-1 बी स्ट्रेनचा पहिला ऊग्ण आढळला होता. 38 वषीय संक्रमित ऊग्ण यूएईहून केरळमधील मलप्परम येथे परतला होता. 17 सप्टेंबर रोजी त्याने स्वत:ला क्वारंटाईन केले. भारतातील पहिला मंकीपॉक्स ऊग्ण हरियाणामध्ये 9 सप्टेंबर रोजी सापडला होता. हरियाणातील हिसार येथे 26 वषीय तऊणामध्ये जुना स्ट्रेन क्लेड-2 आढळून आला होता. 8 सप्टेंबर रोजी त्यांना आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले होते. त्यानंतर नमुने तपासणीत त्याला मंकीपॉक्स संसर्ग झाल्याची पुष्टी मिळाली होती.