महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

बिहारमध्ये कोसळला आणखी एक पूल

07:00 AM Jun 28, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

पाटणा : बिहारमध्ये किशनगंज जिल्ह्यात आणखी एक पूल (सेतू) कोसळल्याची घटना घडली आहे. बहादूरगंज येथील हा सेतू 70 मीटर लांब आणि 12 मीटर रुंदीचा होता. सेतू कोसळल्याची ही राज्यातील गेल्या एका आठवड्यातील चौथी घटना आहे. या सेतूची निर्मिती 2011 मध्ये करण्यात आली होती. अवघ्या 13 वर्षांमध्ये तो कोसळल्याने सार्वजनिक बांधकामांच्या गुणवत्तेचा प्रश्न पुन्हा निर्माण झाला आहे. नेपाळमध्ये जोरदार पाऊस झाल्याने बिहारच्या अनेक नद्यांच्या पाण्याच्या पातळीत अचानक वाढ झाली आहे. या पाणीवाढीमुळे सेतूचा पाया खचला आणि तो पडला, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.

Advertisement

मात्र, सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवीत हानी झाली नाही. सेतू कोसळला तेव्हा त्यावर कोणीही नव्हते. त्यामुळे या दुर्घटनेची विशेष चर्चा झाली नाही, असेही सांगण्यात येत आहे. सेतूचा एक खांब पुरात खचल्याने तो कोसळला. मात्र, त्याची दुरुस्ती त्वरित हाती घेण्यात आली असून भराव टाकून खांब आधीसारखा करण्यात येत आहे. सेतू लहान असल्याने त्याच्या दुरुस्तीसाठी विशेष कालावधी लागणार नाही. मात्र, राज्यातील सर्व सेतूंचे बांधकाम ऑडिट करुन घेण्याची आवश्यकता आहे. तसे केल्यास त्यांची स्थिती समजून येईल आणि आपत्कालीन उपाययोजना आधीच करणे शक्य होईल, असे मत व्यक्त केले जात आहे.

Advertisement

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article