कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

शेजारी देशाला आणखी एक झटका

06:48 AM May 06, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

सेंधा मिठाची ऑर्डर रद्द : अनेक सामग्रीच्या आयातीवरही बंदी

Advertisement

पहलगाम येथे पर्यटकांच्या हत्येनंतर भारत सरकारने पाकिस्तानातून होणाऱ्या आयातीवर बंदी घातली आहे. याचा सर्वाधिक प्रभाव सेंधा नमक (मीठ) आणि मेव्यावर पडणार आहे. अशास्थितीत व्यापाऱ्यांनी सेंधा नमकची ऑर्डर रद्द केली आहे. तसेच नव्या ऑर्डर स्वीकारणे थांबविले आहे.

Advertisement

पाकिस्तानातून सेंधा (लाहोरी) नमक, खारीक, काळे मनुके आणि सब्जा बीज आयात केले जात होते. तर अंजीर, मुनक्का हे अफगाणिस्तानातून पाकिस्तानमार्गे भारतात पोहोचत होते अशी माहिती चेम्बर ऑफ फूड प्रोसेसिंग इंडस्ट्रीज असोसिएशनचे पदाधिकारी अशोक लालवानी यांनी दिली.

सेंधा नमक दर महिन्याला 250-300 टन, 550-600 टन खारीक, 15 टन पिस्ता-काळे मनुके आणि सब्जा बिजाचा व्यापार व्हायचा. पाकिस्तानातून आयात बंद झाल्याने सध्या सेंधा मिठाच्या मोठ्या ऑर्डर रद्द करण्यात आल्या आहेत. पाकिस्तानऐवजी आता अन्य देशांमधून या सामग्रीची आयात होणार आहे. वाहतुकीचा खर्च वाढल्याने याचा प्रभाव त्यांच्या किमतीवर पडणार आहे, परंतु देशहिताकरता पूर्ण व्यापारी वर्ग सरकारच्या निर्णयासोबत असल्याचे संबंधित संघटनांकडून सांगण्यात आले.

पाकिस्तानातून आयात बंद झाल्याने सूती कपड्यांच्या किमतीवरही प्रभाव पडू शकतो. तेथून कापसाची आयात केली जाते. सूती कपड्यांची मागणी वेगाने वाढली आहे. पाकिस्तानातून आयात बंद झाल्याने भारतावर काही काळ प्रभाव पडेल, परंतु पाकिस्तानला मोठे नुकसान होणार असल्याचे समजते.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article