For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आणखी एका बिहारीची काश्मीरमध्ये हत्या

07:00 AM Apr 19, 2024 IST | Tarun Bharat Portal
आणखी एका बिहारीची काश्मीरमध्ये हत्या
Advertisement

अनंतनागमध्ये दहशतवाद्यांकडून गोळीबार, उपचारादरम्यान मृत्यू

Advertisement

वृत्तसंस्था/अनंतनाग

जम्मू-काश्मीरमधील अनंतनाग जिह्यात बुधवारी रात्री दहशतवाद्यांनी पुन्हा एकदा गोळीबार करत परप्रांतियाला लक्ष्य केले. या हल्ल्यात एका बिहारी मजुराला आपला जीव गमवावा लागला. राजा शाह असे मृताचे नाव असून तो बिहारचा रहिवासी असल्याचा दुजोरा सुरक्षा दलांनी दिला आहे. दहशतवाद्यांनी बुधवारी सायंकाळनंतर राजा शाह याच्यावर जवळून गोळीबार केला. हल्ल्यादरम्यान त्याला दोन गोळ्या लागल्या. एक गोळी त्याच्या मानेला लागली, तर दुसरी त्याच्या पोटात लागली. जखमी अवस्थेत त्याला तात्काळ ऊग्णालयात नेण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्याची प्राणज्योत मालवली. राज्यातील ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी या दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध केला आहे. गेल्या दहा दिवसात काश्मीरमध्ये अशाप्रकारे परप्रांतियावर हल्ला होण्याची दुसरी घटना आहे. दहशतवाद्यांनी गोळीबार केल्यानंतर घटनास्थळावरून पोबारा केला. सदर भागात सध्या नाकेबंदी करण्यात आली आहे. हल्लेखोरांना पकडण्यासाठी सुरक्षा दल सध्या शोधमोहीम राबवत आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.