रेल्वे अपघाताचा आणखी एक प्रयत्न
उत्तर प्रदेशात बरेली-वाराणसी एक्स्प्रेसच्या मार्गात लाकडी ओंडक्याचा अडथळा
वृत्तसंस्था/ चंदीगड
उत्तर प्रदेशमध्ये पुन्हा एकदा एक्स्प्रेस रेल्वे ऊळावरून घसरवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. रेल्वेमार्गावर लाकडाचा ओंडका आढळून आला. ह्या ओंडक्याला रेल्वे धडकल्यानंतर ती रुळावरून न घसरल्यामुळे मोठी दुर्घटना टळली. उत्तर प्रदेशातील लखनौ ते नवी दिल्ली रेल्वेमार्गावर हा मोठा अपघात टळला आहे. इंजिनचालकाच्या समयसूचकतेमुळे हा अपघात टळल्याचे रेल्वेच्या सूत्रांकडून सांगण्यात आले.
उत्तर प्रदेशातील मलिहाबाद ते काकोरी रेल्वे स्थानकादरम्यान रेल्वेमार्गावर लाकूड ठेवण्यात आल्याचे स्थानिक अधिकाऱ्यांनी सांगितले. बरेली-वाराणसी एक्स्प्रेस रेल्वे या मार्गावरून जात असताना हे लाकूड रेल्वेच्या इंजिनमध्ये अडकले. दोन फूट लांब असलेल्या ह्या लाकडाच्या तुकड्यावर टेन आदळल्याचे रेल्वे अधिकाऱ्याकडून सांगण्यात आले. मात्र, लोको पायलटने तात्काळ टेन थांबवल्यामुळे मोठी दुर्घटना टळली. घटनेनंतर लगेचच स्टेशन मास्तरांना अप आणि डाऊन ट्रॅकवर जाण्याचा इशारा देण्यात आला. ट्रॅकच्या तपासणीत अन्य एका ठिकाणी एक लाकडी फांदीही आढळून आली. या तपासणीदरम्यान सुमारे दोन तास रेल्वे वाहतूक ठप्प झाली होती.
रेल्वेमार्गात अडथळे ठेवल्याचे प्रकार यापूर्वीही घडले आहेत. उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये सप्टेंबर महिन्यात भिवानीकडे जाणारी कालिंदी एक्स्प्रेस ऊळावरून घसरण्यापासून वाचली होती. भरलेला गॅस सिलिंडर रेल्वेमार्गावर ठेवण्यात आला होता. बराजपूर ते बिल्हौर दरम्यान 100 किमी वेगाने धावणारी रेल्वे गॅस भरलेल्या सिलिंडरला धडकल्यानंतर मोठा आवाज झाला. यानंतर लोको पायलटने इमर्जन्सी ब्र्रेक लावून टेन थांबवल्यामुळे मोठी दुर्घटना टळली. त्यापूर्वीही रायबरेलीमध्ये टेन उलटवण्याचा प्रयत्न झाला होता. रायबरेलीत लक्ष्मणपूर स्टेशनजवळ एक मालगाडी रेल्वेमार्गावर ठेवण्यात आलेल्या सिमेंटच्या खांबाला धडकली होती. लोको पायलटच्या हुशारीमुळे ही दुर्घटना टळली होती.