आणखी 85 विमानांमध्ये दिवसभरात बॉम्बची धमकी
आतापर्यंत 600 कोटी ऊपयांचे नुकसान
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
विमाने बॉम्बने उडवण्याची धमकी देण्याची प्रक्रिया सुरूच आहे. गुऊवारी दिवसभरात आणखी 85 उ•ाणांमध्ये बॉम्बची धमकी देण्यात आली. मीडिया रिपोर्ट्सनुसार, यामध्ये एअर इंडियाच्या 20, इंडिगोच्या 20, विस्ताराच्या 20 आणि अकासा एअरलाईन्सच्या 25 विमानो•ाणांचा समावेश आहे. गेल्या 11 दिवसात 255 हून अधिक विमानांना बॉम्बच्या धमक्मया मिळाल्या आहेत. त्यामुळे विमान वाहतूक क्षेत्राला 600 कोटींहून अधिक ऊपयांचे नुकसान झाले आहे.
गुरुवारी प्राप्त झालेल्या धमक्यांच्या पार्श्वभूमीवर गोवा आंतरराष्ट्रीय विमानतळ (दाबोळी) आणि मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ हाय अलर्टवर ठेवण्यात आले होते. या विमानतळांवर उतरणाऱ्या चार विमानांना बॉम्बच्या धमक्मया मिळाल्या होत्या. त्यानंतर दोन्ही विमानतळांसाठी बॉम्ब थ्रेट असेसमेंट कमिटी (बीटीएसी) स्थापन करण्यात आली. अकासा एअरने यासंबंधी निवेदन जारी करून ‘आज आमच्या काही फ्लाईट्सवर सुरक्षा अलर्ट प्राप्त झाला आहे. एअरलाईनचे प्रतिसाद कार्यसंघ स्थानिक प्राधिकरणांसह सुरक्षा आणि सुरक्षा प्रोटोकॉलचे पालन करत आहे’, असे जाहीर केले.
वाढत्या धमक्यांच्या पार्श्वभूमीवर 23 ऑक्टोबर रोजी आयटी मंत्रालयाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’, मेटा आणि एअरलाईन कंपन्यांसोबत यासंबंधी चर्चा करण्यासाठी एक ऑनलाईन बैठक घेतली होती. या बैठकीत विमान कंपन्यांना मिळणाऱ्या धमक्यांसंबंधी अफवांचा प्रसार रोखण्यासाठी तुम्ही काय केले? अशी विचारणा यावेळी सरकारने सोशल मीडिया कंपन्यांना केली. तसेच सोशल मीडिया प्लॅटफॉर्म अशा घटनांना प्रोत्साहन देत असल्याचे परिस्थितीवरून दिसून येत असल्याचा दावाही करण्यात आला.