हिंडलगा संत मीराच्या वार्षिक क्रीडांना प्रारंभ
वार्ताहर/हिंडलगा
लक्ष्मीनगर येथील संत मीरा इंग्रजी माध्यम शाळेच्या वार्षिक क्रीडा स्पर्धांचा शुभारंभ शाळेच्या भव्य पटांगणात झाला. अध्यक्षस्थानी डॉ. विजय गोवेकर, प्रमुख अतिथी पंकज रायमाने, क्रीडा शिक्षक अशोक शिंत्रे, भालचंद्र गाडगीळ, व्यवस्थापक समितीचे कार्यदर्शी देवीदास कुलकर्णी उपस्थित होते. प्रथम शालेय विद्यार्थिनीनी इशस्तवन सादर करुन स्वागत नृत्य सादर केले. ध्वजवंदन व आकर्षक पथसंचलनानंतर प्रमुख मान्यवरांच्या हस्ते सरस्वती प्रतिमेचे पूजन, दीपप्रज्वलन करुन शुभारंभ करण्यात आला. मान्यवरांच्या स्वागतानंतर एकलव्य, अर्जुन, द्रोणाचार्य, बलराम या संघाच्या प्रमुखांनी क्रीडाज्योत प्रज्वलीत केल्यानंतर शाळेची विद्यार्थी प्रतिनिधी सुजल डोंबलेने शपथ देवविली. प्राथमिक, माध्यमिक खेळाडूंना आकर्षक कवायत सादर केली. यावेळी धावणे, रिले, लांबउडी, उंचउडी, कबड्डी, खोखो, मलखांब, गोळाफेक, फुटबॉल, चेंडूफेक या क्रीडा प्रकारांचा समावेश होता.