महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

गोगटे कॉलेजच्या वार्षिक क्रीडा स्पर्धा उत्साहात

10:04 AM Jun 19, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

बेळगाव : गोगटे कॉलेजच्या शारीरिक शिक्षण आणि क्रीडा विभागाने  केएलएस जीसीसी मैदानावर बीकॉम विद्यार्थ्यांसाठी वार्षिक क्रीडा स्पर्धा मोट्या उत्साहात पार पडल्या. या स्पर्धा विविध इनडोअर आणि आउटडोअर स्पोर्ट्स प्रकारांत सहभागी होण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करण्यासाठी या क्रीडा स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते. क्रीडा स्पर्धांचे उद्घाटन प्रमुख पाहुण एनआयएस जलतरण प्रशिक्षक विश्वास पवार, प्राचार्य डॉ वेणुगोपाल जालिहाल यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख पाहुण्यांनी खेळ आणि आरोग्य याविषयी माहिती सांगितले आणि विद्यार्थ्यांना कोणत्याही वयात खेळात सहभागी होण्यासाठी प्रेरित केले पाहिजेत.

Advertisement

यावेळी  समन्वयक बी.कॉम नयना रायचूर, डॉ. कलावती सांबरेकर - जिमखाना अध्यक्ष, मंजुनाथ गौडा, नम्रता अंतलमरद  - शारीरिक शिक्षण संचालक, अमेय अडकूरकर - क्रीडा सचिव, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते. मिश्र क्रिकेट, फुटबॉल, व्हॉलीबॉल, थ्रोबॉल, टग ऑफ पॉर, ऍथलेटिक्स (100 मी., 400 मी, 4x100 मी रिले, 1500 मी, 5000 मी आणि गोळा फेक), इनडोअर (बुद्धिबळ, कॅरम आणि टेबल टेनिस) यासारख्या क्रीडा स्पर्धा. सर्व सूचीबद्ध कार्यक्रमांमध्ये 1300 हून अधिक विद्यार्थ्यांनी भाग घेतला. केएलएसचे अध्यक्ष  पी एस सावकर, ए.के. तगारे जीसीसीच्या  जीसीचे अध्यक्ष , प्राचार्य डॉ. वेणुगोपाल जालिहाल, जिमखाना चेअरमन, डॉ. कलावती सांबरेकर, शारीरिक शिक्षण संचालक श्री. मंजुनाथ गौडा, कु.नम्रता अंतलमरद यांच्या हस्ते विजेत्यांचे बक्षिसे दऊन गौरविण्यात आले.

Advertisement

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article