ठळकवाडीच्या वार्षिक क्रीडा स्पर्धेला प्रारंभ
11:05 AM Dec 11, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
बेळगाव : एसकेई सोसायटी संचलित ठिळकवाडी येथील ठळकवाडी स्कूलच्या वार्षिक क्रीडा स्पर्धांना मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला. आरपीडी महाविद्यालयाच्या मैदानावरती उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे विनय बेहेरे, भरत शानभाग, विजय चौगुले, मुख्याध्यापक आर. आर. कुडतरकर शिक्षक वर्ग उपस्थित होते. प्रारंभी पाहुण्यांचे हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. हनुमान मूर्तीचे पूजन विनय बेहेरे यांनी केले. पाहुण्यांचा परिचय सी. वाय. पाटील यांनी करून दिला. विद्यार्थ्यांनी पथसंचलन करून पाहुण्यांना मानवंदना दिली. जिल्हास्तरीय स्पर्धेत चमक दाखवलेल्या विराज बस्तवाडकर, मयूर जाधव, साईनाथ पाखरे व श्री हुंद्रे यांनी मैदानाभोवती क्रीडा ज्योत फिरवून पाहुण्यांकडे सुफूर्द केली. विद्याने विद्यार्थ्यांना शपथ दिली.
Advertisement
Advertisement