रणझुंझार, विद्यामंदिर, कॉन्व्हेंटमध्ये वार्षिक क्रीडास्पर्धा उत्साहात
वार्ताहर/सांबरा
निलजी येथे रणझुंझार हायस्कूल, विद्यामंदिर व कॉन्व्हेंट स्कूलच्या वार्षिक क्रीडा स्पर्धा उत्साहात पार पाडल्या. क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटनाला रणझुंझार शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा विमलताई मोदगेकर होत्या. प्रारंभी कार्यक्रमाची सुऊवात विद्यार्थ्यीनींच्या ईशस्तवन व स्वागत गीताने झाली. प्रास्ताविक व स्वागत रणझुंझार विद्यामंदिरचे मुख्याध्यापक सोमनाथ कुरंगी यानी केले. विमलताई मोदगेकर यांनी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन केले. सरस्वती फोटो पूजन परशराम मल्लानाचे यांनी केले तर सिद्राय वर्पे यांनी श्रीफळ वाढविले. गणेश मोदगेकर व सहकार्यानी क्रीडा ज्योत प्रमुख पाहुण्यांच्याकडे सुपूर्द केली. अनन्या अक्षिमणीने विद्यार्थ्यांना शपथ देवविली. रणझुंझार को.ऑप सोसायटीचे उपाध्यक्ष निखिल मोदगेकर यांनी विद्यार्थ्यांना क्रीडा कौशल्य व खेळातून आपले करियर कशा पद्धतीने घडविता येते ते सांगितले. मान्यवरांच्या हस्ते विविध क्रीडा स्पर्धांचे उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाला रणझुंझार हायस्कूलचे मुख्याध्यापक वाय.पी.पावले, रणझुंझार कॉन्व्हेंट स्कूलच्या मुख्याध्यापिका सविता अक्षिमणी, क्रीडा शिक्षक एन.व्ही.आपटेकर, शिक्षकवर्ग, कर्मचारी वर्ग आणि विद्यार्थी उपस्थित होते.