For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

वार्षिक राशीभविष्य २०२५ : मेष

04:20 PM Jan 01, 2025 IST | Tarun Bharat Portal
वार्षिक राशीभविष्य २०२५   मेष
Advertisement

मेष राशीच्या व्यक्तींना कुणाच्याही दबावाखाली काम करणे आवडत नाही. स्वच्छ, पारदर्शी तसेच आदर्शवत् चारित्र्य असते. एकदा काम हाती घेतल्यावर ते पूर्ण केल्याशिवाय मागे हटत नाहीत. निर्मोही व्यक्तिमत्व असून इतरांना मदत करण्यात आनंद मानतात. कल्पनाशक्ती अगाध असल्याने विचारातच निमग्न असतात. राग लवकर येतो. अपमानाचा बदला घेण्यास विसरत नाहीत. सुप्त कलाकार असतो त्यामुळे या व्यक्ती स्वत:ला श्रेष्ठ समजतात. नेतृत्वक्षमता उत्तम असते. कमी बोलणे, हट्ट करणे हा यांचा स्थायीभाव आहे.

Advertisement

राशिचक्रातील सर्वात पहिली रास मेष आहे. या राशीचा स्वामी मंगळ असून धातू संज्ञक ही राशी चर (चलित) स्वभावाची असते. राशीचे प्रतीक मेंढा हा संघर्षाचे प्रतीक आहे. मेष राशीच्या व्यक्ती आकर्षक असून त्यांचा स्वभाव रुक्ष असतो. दिसायला सुंदर. कुणाच्याही दबावाखाली काम करायला आवडत नाही. यांचे चारित्र्य स्वच्छ, पारदर्शी तसेच आदर्श असते. बहुमुखी प्रतिभेचे स्वामी. समाजात यांचे वर्चस्व असून मान सन्मानही मिळत असतो. निर्णय घेण्यात घाई करतात. तसेच एकदा काम हाती घेतल्यावर ते पूर्ण केल्याशिवाय मागे हटत नाहीत. या व्यक्तींचा स्वभाव कधी कधी विरक्तीचाही असतो. मोह या राशीच्या व्यक्तींच्या स्वभावात नाही. इतरांना मदत करण्यात आनंद मानतात. कल्पनाशक्ती अगाध असून विचार जास्त करतात. अग्नितत्व असल्यामुळे राग लवकर येतो. कोणतेही आव्हान स्वीकारण्यास तयार असतात. स्वत:चा अपमान लवकर विसरत नाहीत, मनातच दाबून ठेवतात. संधी मिळाल्यानंतर बदला घेण्यास विसरत नाहीत.स्वत:च्या मतावर ठाम राहतात. यांच्यामध्ये एक कलाकार लपलेला असतो. हे लोक प्रत्येक काम करण्यात सक्षम असतात. स्वत:ला श्रेष्ठ समजतात. स्वत:च्या मर्जीनुसार इतरांकडून काम करून घेण्यास इच्छुक असतात. यामुळे यांचे अनेक शत्रू निर्माण होतात. एकच काम दोन-दोनदा करणे या राशीच्या लोकांना आवडत नाही. एकाच ठिकाणी जास्त दिवस राहणेसुद्धा यांना आवडत नाही. नेतृत्वक्षमता उत्तम असते. कमी बोलणे, हट्ट करणे यांचा स्वभाव आहे. कधी-कधी प्रेमसंबंधामध्ये दु:खी होतात.

मेष राशिच्या व्यक्तींमध्ये भरपूर ताकत व उत्साह असतो, ज्यामुळे या व्यक्ति नेहमी पुढाकार घेण्यास तत्पर असतात. स्पष्टवत्तेपणा ही त्यांची मुख्य खुण. जन्मजात पुढारी असल्यामुळे मेष राशिला दुसऱ्यांकडून आदेश घेणे पटत नाही. मेष राशिचे लोक स्वत:ला आणि त्यांच्या आसपासचे वातावरण स्वच्छ ठेवण्यास प्राधान्य देतात. कुठलेही कार्य पूर्ण करताना ते अगदी नीटनेटके असावे, असा प्रयत्न करतात. या राशीच्या व्यक्तींचे डोळे आणि कान नेहमीच उघडे असतात. त्यांना कोणतंही काम द्या, ते करतील पण त्यांचं प्राधान्य नेहमीच सुरक्षेला असेल. या व्यक्ती अतिशय संवेदनशील असतात. दुसऱ्यांच्या भावना लवकर समजून घेतात. मात्र आपल्या भावना सांगताना त्यांना थोडा त्रास होतो. इतरांना योग्य सल्ला देतात मात्र जेव्हा स्वत:वर वेळ येते तेव्हा त्याच गोष्टीमध्ये चुकतात. स्वभावाने बऱ्यापैकी उत्साही आणि क्रियाशील असतात. मूलभूत गोष्टींनी तुम्हाला समाधान मिळत नाही आणि तुम्ही नेहमी काहीतरी मोठे ध्येय साध्य करण्यासाठी धडपडत असता. आपले काम लवकरात लवकर संपवणे हे तुमच्या स्वभावातच आहे. वेग, ऊर्जा आणि क्रियाशीलता तुमच्यात स्पष्टपणे दिसून येते. तुमच्या डोक्यात एखादी कल्पना आली, तर तुम्ही लगेचच ती कल्पना अमलात आणता. तुम्ही खिलाडूवृत्तीचे आणि बुद्धिमान आहात. तुमच्या स्वभावातच एक प्रकारचा गुढपणा आहे, ज्यामुळे तुम्हाला धार्मिक, अलौकिक आणि गुप्त ज्ञानाबद्दल कुतूहल असते. तुम्ही बिनधास्त आणि धाडसी आहात.

Advertisement

ग्रहमान

वर्ष आरंभ ते 14 मे 2025 पर्यंत गुरु वृषभ राशीत म्हणजे आपल्या धनस्थानी राहणार आहे. त्यानंतर गुरु मिथुन राशीला  म्हणजे आपल्या पराक्रम स्थानी जाणार. अल्पकाळासाठी 19ऑक्टोबरला गुरु कर्क राशीला जाणार आहे. पुन्हा वक्रिय होऊन 06 डिसेंबरला मिथुनेत  येणार आहे. आर्थिक व्यवहार यशस्वी होतील. कामकाजात यश मिळणार आहे. पराक्रमातील गुरु मात्र थोडं तडजोड करून आपल्याला व्यवहारात यश देईल. गुरुचे एकंदरीत फळ तुमच्यासाठी शुभ राहणार आहे.लग्नासाठी  वर्षभर गुरुबळ उत्तम आहे. वर्ष आरंभ ते 29 मार्चपर्यंत शनी कुंभ राशींतून भ्रमण करीत आहे जो आपल्याला लाभ करून देणारा आहे. कोणत्याही उद्योग व्यापार व आर्थिक व्यवहारांमध्ये फायदेशीर ठरणारा आहे. मात्र 29 मार्च 2025 रोजी रात्री नऊ वाजून बेचाळीस मिनिटांनी शनी मीन राशीत प्रवेश करेल. जो आपल्यासाठी साडेसातीचा प्रारंभ करणारा आहे. साडेसातीमधील पहिल्या अडीच वर्षाचा कालखंड सुरू होत आहे. या काळामध्ये आपल्याला काही अडीअडचणी येण्याची शक्यता आहे. कोणतेही व्यवहार करताना काळजी घेतली पाहिजे. शनी व्यय स्थानात भ्रमण करीत असल्यामुळे पुष्कळशा गोष्टींमध्ये अडचणी किंवा विलंब होण्याची दाट शक्यता आहे. या काळात तुम्हाला मानसिक त्रास आणि तणाव जाणवेल. व्यावसायिक भागिदारांमुळे तुमच्यासमोर समस्या उभ्या राहतील. आर्थिक दृष्ट्या हा काळ तुमच्यासाठी फार बरा नाही. प्रवास फार फलदायी ठरणार नाही. धोका पत्करू नका. तुमच्या जवळच्या माणसांशी वाद होतील, वर्ष आरंभ ते 18मे राहू मिनेत तर केतू कन्या राशीत राहणार. 18 मे नंतर राहू कुंभ राशीला येत असून केतू सिंह राशीत जात आहे. लाभातील राहू आपल्यासाठी अनेक मार्गाने लाभ करून देऊ शकतो. मात्र कर्ज करणे टाळलेले बरे. आपल्या मुलांबरोबर वाद-विवाद होण्याची दाट शक्यता आहे. केतूचे भ्रमण आपल्यासाठी संमिश्र राहणार आहे. आरोग्याच्या बारीक सारीक किरकिरी उद्भवू शकतात. कानाचे विकार होऊ शकतात. शत्रूच्या कारवाया उघडकीस येतील. एकंदरीत गुरु राहू शनीचे भ्रमण पाहता या वर्षी  आपल्यासाठी  लाभ आणि हानी यांचे योग बहुत वेळा येत राहणार.

नोकरदार

तुमच्या आजुबाजूच्या माणसांना तुमचे मूल्य कळेल आणि त्यामुळे तुम्ही आनंदी व्हाल, तसेच तुम्ही सतत तुमच्या क्षमतेच्या 100 टक्के काम करता हा दुसऱ्यांना प्रेरीत करणारा घटक असेल. प्रवास करण्यास हा अत्यंत अनुकूल काळ आहे. तुमच्याकडे येणाऱ्या सुखाचा उपभोग घ्या. अखेर तुम्ही यशाची फळें चाखू शकता आणि तुमच्या कष्टाचे चीज होण्याचा हा काळ आहे. तुम्ही प्रसिद्ध व्यक्तींच्या सहवासात याल. तुमची अपत्याची इच्छा पूर्ण होईल. तुमच्या कल्पकतेची प्रशंसा होईल. तुम्ही नेहमीच सकारात्मक दृष्टीकोन बाळगून असता आणि या वर्षातील घटना तुमच्या सकारात्मक दृष्टिकोनात भरच घालतील. तुमच्या राशीला उत्तम कालखंडात तुम्ही गुंतवणूक केलीत तर तुम्हाला चांगला फायदा होऊ शकेल. तुमच्या जवळच्या व्यक्ती आणि सहकाऱ्यांकडून सहकार्य आणि आनंद मिळेल. विरोधकांवर मात कराल. कौटुंबिक आयुष्य समाधानी राहील. फायदेशीर व्यवहार कराल. कर्जासाठी अर्ज केला असेल तर कर्ज मंजूर होईल. आरोग्याच्या थोड्याशा कुरबुरी राहतील. व्यावसायिक आणि खासगी आयुष्यात समतोल साधाल आणि आयुष्याच्या या दोन्ही महत्त्वाच्या अंगांकडे तुम्ही उत्तम प्रकारे लक्ष पुरवाल. खूप कष्टांनंतर तुमच्या इच्छा पूर्ण होतील, आणि अखेर तुम्हाला समृद्धी, उत्पन्न आणि लाभ मिळेल. स्पर्धेत विजेते ठराल आणि मुलाखतींमध्ये यशस्वी व्हाल. इतरांकडून मदत घेण्यापेक्षा स्वत:च्या क्षमतांचा वापर करा. मालमत्तेच्या व्यवहारातून या कालावधीत चांगलाच फायदा होईल. आर्थिक वादांचा निकाल तुमच्या बाजूने लागेल. दीर्घ काळापासून अपेक्षित असलेली पगारवाढ आता होईल. तुम्ही या काळात काहीसे धाडसी आणि आक्रमक असाल. मानसिक तोल ढळण्याची शक्यता आणि तरतमभाव ठेवणे कठीण जाईल. तुमची लोकप्रियता कमी होईल आणि भांडणामुळे अडचणीत येण्याची शक्यता. प्रेमासाठी हा कालावधी प्रतिकूल आहे. जोडीदार आणि पाल्यांचे आरोग्य सांभाळा. वरिष्ठांकडून लाभ संभवतो.

स्त्री वर्ग

नशीबाची साथ आणि मानसिक स्थैर्य यामुळे तुमचे गृहस्थ जीवन सकारात्मक राहील. प्रवास, उच्चशिक्षण, संवाद, नवीन उद्योगाची सुरुवात, व्यवसाय या दृष्टीने हे वर्ष अत्यंत अनुकूल आहे. व्यावसायिकदृष्ट्या तुम्हाला चांगले निष्कर्ष मिळतील. एकूणातच हा काळ अत्यंत अनुकूल असेल. तुम्ही तुमचा स्वभाव समतोल ठेवा, जेणेकरून चांगले निष्कर्ष मिळतील. या काळात विकास होईल. तुमचे सहकारी आणि वरिष्ठ यांच्याशी सुसंवाद राहील. उत्पन्नाचा स्रोत व्यवस्थित राहील आणि कौटुंबिक आयुष्याचा आनंद घ्याल. अध्यात्मिकदृष्ट्या तुम्ही सक्रीय व्हाल. तुम्ही बढतीची अपेक्षा करत असाल तर ते नक्की होईल. तुमच्या मित्रांची संख्या वाढेल. अचानक होणारा प्रवास तुम्हाला फलदायी ठरेल. तुम्ही थोडा दानधर्म कराल आणि तुमची या काळात समृद्धी होईल. माणसं तुमचा आदर्श ठेवतील आणि सल्ला घेण्यासाठी तुमच्याकडे येतील. सगळ्या समस्या सुटू लागतील. या सर्व काळ तुमच्यासाठी अत्यंत अनुकूल आणि उर्जेचा राहील. हा काळ दैव, क्षमता आणि धाडसाचा असणार आहे. वरिष्ठाकंडून तुम्हाला ऐहिक लाभ मिळेल. त्यामुळे नवीन प्रयत्न करण्यासाठी आणि नवीन ठिकाणी प्रवास करण्यासाठी हा अत्यंत अनुकूल काळ आहे. तुम्ही अनेकांशी संबंध जोडाल आणि यातून चांगल्या प्रकारची देवाण-घेवाण होईल. हा कालावधी तुमच्या भावंडांसाठी आनंद आणि यश घेऊन येईल. तुमच्या कारकिर्दीमध्ये एक पुढचे पाऊल टाकण्यासाठी आणि मोठी झेप घेण्यासाठी हा काळ अत्यंत अनुकूल आहे. भागिदार किंवा सहकाऱ्यांकडून तुम्हाला लाभ मिळण्याची शक्यता आहे. जोडीदाराकडून तुम्हाला आनंदाचे क्षण मिळतील. प्रेम आणि रोमान्स या दोन्ही प्रकारात सुख लाभेल. व्यवहार आणि परदेशी प्रवासातून लाभ होईल. आरोग्याच्या तक्रारीमुळे मन:शांती ढळेल. रोजच्या जीवनात स्वयंशिस्त, स्वयंनियंत्रण अंगी बाणवणे तुम्हाला फायदेशीर ठरेल. ताप आणि संधीवातापासून सावध राहा आणि काळजी घ्या. तुमच्या कल्पना प्रत्यक्षात उतरवाल तेव्हा त्यातून आर्थिक लाभ होईल. तुमच्याकडे आर्थिक आवक निश्चितच वाढेल. तुमचे शत्रू तुमच्या वरचढ होऊ शकणार नाहीत. एकूणातच वातावरण आनंदी राहील. तुमच्या कुटुंबातील सदस्यांमध्ये वाढ होईल. तुमचा स्वभाव आणि चुकीची भाषा वापरल्यामुळे तुमच्या जवळच्या व्यक्तींचे आणि तुमच्या संबंधात दुरावा निर्माण होईल, त्यामुळे जिभेवर ताबा ठेवा.

विद्यार्थी वर्ग

विद्यार्थ्यांसाठी हे वर्ष अत्यंत प्रतिकूल असेल. जे विद्यार्थी परदेशात शिक्षण घेण्याचा विचार करत आहेत, त्यांच्यासाठी हा काळ चांगला असेल, त्यांना चांगल्या महाविद्यालयात प्रवेश मिळण्याची शक्यता आहे. संशोधन करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी 2025 हे वर्ष खूप आव्हानात्मक आहे. मेनंतर विद्यार्थ्यांची एकाग्रता सुधारेल. पीएचडी करणाऱ्या विद्यार्थ्यांना वर्षअखेरीस अधिक फायदा मिळेल. दुसरीकडे, शैक्षणिक विद्यार्थ्यांसाठी हे वर्ष सामान्य राहणार आहे.

नूतन वर्षाभिनंदन!!!

राशीचे चिन्ह  : मेंढा       राशीस्वामी : मंगळ       शुभवार : मंगळवार       अशुभ वार : रविवार       घात मास : कार्तिक        शुभ रंग : लाल व नारींगी        भाग्यरत्न : पोवळा        आराध्य देवता : श्री गणेश

Advertisement
Tags :

.