For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

वार्षिक राशिभविष्य 2024 : मकर

09:50 AM Jan 10, 2024 IST | Tarun Bharat Portal
वार्षिक राशिभविष्य 2024   मकर
Advertisement

मकर राशीच्या व्यक्ती महत्वाकांक्षी व मेहनती असल्याने मन लावून काम करतात. दुसऱ्यांवर हुकुमत गाजविण्यात माहीर असतात. कोणाच्याही मनाशी खेळणे आवडत नाही. अन्यायाविरूद्ध पेटून उठतात. ईर्ष्या असल्याने सकारात्मक विचारांनी आयुष्यात त्या पुढे जातात. लहान सहान गोष्टींवर वाद घालण्याचा यांचा स्थायीभाव असतो.

Advertisement

  • राशीस्वामी - शनी
  • शुभवार - शनिवार
  • अशुभ वार - मंगळवार
  • घात मास - वैशाख
  • शुभ रंग - निळा
  • भाग्यरत्न - नीलम
  • आराध्य देवता - श्री शनि

मकर राशीच्या व्यक्ती या अत्यंत महत्वाकांक्षी असतात आणि अगदी प्रॅक्टिकलदेखील. स्वत:ला खोटे दाखविण्यात त्यांना अजिबातच रस नसतो. आपण जसे आहोत तसंच दाखविण्यात त्या वाकबदार असतात. अत्यंत मेहनती असल्याने कोणतेही काम अत्यंत मन लावून पूर्ण करतात. पण ज्या गोष्टींत रस नसतो, त्यामध्ये अत्यंत आळशीपणा करतात. मकर राशीच्या व्यक्तींना दुसऱ्यांवर हुकूमत गाजवणं अत्यंत आवडतं आणि कोणताही अन्याय सहन करणं जमत नाही. समोरच्या व्यक्तींना कितीही वाईट वाटलं तरी तोंडावर बोलून या व्यक्ती मोकळ्या होतात. कोणाच्याही मागून बोलणं या व्यक्तींना आवडत नाही. आपल्या वयाचा कधीही थांगपत्ता लागू न देणं हे या व्यक्तींचं वैशिष्ट्या आहे. नेहमी तरूण राहणे आणि तसंच दिसण्याचा प्रयत्न करणे यांना आवडते. या व्यक्तींचे व्यक्तिमत्व चार्मिंग असते. मकर राशींच्या व्यक्तींसाठी प्रेम ही एक गरज असते. या व्यक्ती थोड्या विचित्र स्वभावाच्या असतात. आपल्यापेक्षा मोठ्या अथवा अगदी लहान व्यक्तींमध्ये या व्यक्तींना रस असतो. कोणत्या चुकीच्या व्यक्तीच्या प्रेमात तर अडकून नाही ना पडणार याची चिंता या व्यक्तींना असते. आपला मिस्टर परफेक्ट अथवा मिस राईट मिळवायला या व्यक्तींना खूप वेळ लागतो. या व्यक्तींचे मन जिंकून घेणे थोडे कठीण आहे. पण या व्यक्ती अत्यंत समजूतदार आणि प्रामाणिक असतात. प्रेम म्हणजे यांच्यासाठी लग्न. कोणाच्याही मनाशी खेळणे या व्यक्तींना जमत नाही. प्रेम म्हणजे खेळ अथवा टाईमपास हा शब्द यांच्याकडे नाही. सकारात्मक विचार हे मकर राशीचे वैशिष्ट्या आहे. सकारात्मक विचारांनीच या व्यक्ती आपल्या आयुष्यात पुढे जातात आणि आपली स्वप्नं पूर्ण करतात. तर दुसऱ्यांविषयी ईर्ष्या असणे ही मात्र यांची कमकुवत बाजू आहे. दुसऱ्यांच्या आनंदात सहसा तितक्या मनापासून या व्यक्ती सहभागी होत नाहीत. समोर आपल्याला काहीही फरक पडत नाही असं दाखवलं तरीही मनापासून मात्र त्यांना आवडतंच असं नाही. तसंच कोणत्याही प्रकारचे खाणे असो, त्यांची जीभ ताब्यात नसते. मकर राशीच्या व्यक्तींची अजून एक गोष्ट म्हणजे अगदी लहानसहान गोष्टींवर या व्यक्ती वाद घालतात. त्यामुळे काही बाबतीत लोक यांची मस्करी करतात. पण या सगळ्या गोष्टींमुळे मकर राशीच्या व्यक्तींना कोणताही फरक पडत नाही.

ग्रहमान

Advertisement

गुरु 1 मे पर्यंत तुमच्या चतुर्थ भावात राहून, 1 मे पासून तुमच्या पंचम भावात जाऊन संतान सुख देऊ शकतात. तुमच्या कमाईमध्ये उत्तम वाढ पहायला मिळू शकते. चतुर्थातील गुरु तितकासा शुभ नसतो, मात्र पंचमस्थानात जसा गुरु जाईल तसा एक प्रकारे भाग्योदय होणार. लग्नासाठी उत्तम गुरुबळ सुरू होईल. कौटुंबिक सौख्य लाभेल. राहु पूर्ण वर्ष तुमच्या तृतीय भावात राहून तुम्हाला पराक्रमी बनवेल आणि यामुळे व्यापारात तुम्ही अनेक प्रकारची जोखीमही घेऊ शकता, परंतु, लक्षात ठेवा की, तुम्हाला आपल्याकडूनही प्रयत्न करावे लागतील, तेव्हाच जीवनात यश प्राप्त करू शकता. तुमच्या लहान लहान यात्रा होतील, जे तुम्हाला प्रसन्नता प्रदान करेल. द्वितीय भावात शनी असण्याने आपला क्रोध आणि स्वास्थ्य सोडले असता कार्यक्षेत्रात तुम्हाला उत्तम यश मिळू शकते. दर शनिवारी श्री शनी स्तोत्राचे पठण करावे, आपल्यासाठी शेवटच्या अडीच वर्षाची साडेसाती चालू आहे. कुंभेचा शनी हा तुमच्यासाठी धनकारक होणार आहे. धनस्थानातील शनीचे भ्रमण असल्यामुळे आर्थिक व्यवहार करताना फार सांभाळून केला पाहिजे. पैसे गुंतवतानासुद्धा आपल्याला काळजी घेतली पाहिजे तसेच शरीराचा खालचा भाग पाय वगैरे दुखल्यास काळजी घेतली पाहिजे. भाग्यातील केतू काही वेळेला शुभ फळे देतो, मात्र मानसिक दडपण येऊ शकते, साडेसाती चालू आहे, त्यामुळे आरोग्याची विशेष काळजी घ्या. आर्थिक व्यवहार करतानासुद्धा काळजी घ्यावी, कोणालाही मदत करू नका व घेऊही नका. विवाहासाठी मेनंतर गुरुबळ सुरू होणार आहे. 1 मे रोजी बृहस्पती पंचम भावात प्रवेश करेल आणि येथून तुमच्या नवम भाव, एकादश भाव आणि तुमच्या प्रथम भाव अर्थात तुमच्या राशीला पाहतील, यामुळे तुमची आर्थिक स्थिती आणि वित्तीय संतुलन साधण्यात यश मिळेल.

नोकरदार

या कालावधीची सुरुवात काहीशी कठीणच होईल. तुमच्या कामात आणि संधीमध्ये कपात होईल, पण अनावश्यक कामे मात्र वाढतील. नवीन गुंतवणूक किंवा धोके पत्करणे टाळावे, नुकसान संभवते. नवीन प्रोजेक्ट किंवा नवीन गुंतवणूक करू नका. तुमच्या वरिष्ठांशी आक्रमकपणे वागू नका. इतरांकडून मदत घेण्यापेक्षा स्वत:च्या क्षमतांचा वापर करा. चोरी किंवा तत्सम कारणांमुळे आर्थिक नुकसान संभवते. तुमची आणि तुमच्या कुटुंबियांची काळजी घ्या,  काही अनपेक्षित समस्या उद्भवतील. नातेवाईकांशी सलोख्याचे संबंध ठेवणे इष्ट राहील. आरोग्याची तपासणी करणे आवश्यक आहे. दीर्घकालीन आजार संभवतो. कफ, निरुत्साह, डोळ्यांचे विकार आणि विषाणूंमुळे होणाऱ्या तापाने तुम्ही त्रासलेले असाल. जोडीदार आणि मुलांच्या आरोग्याची काळजी घ्या. वस्तुस्थिती पडताळूनच उद्योगातील व्यवहार करा. असे असले तरी तुम्ही तुमच्या नशीबावर फार विसंबून राहू नका. तुम्ही तुमचा पैसा बरेच ठिकाणी अडकवल्यामुळे रोख रकमेची कमतरता भासू शकेल. नातेवाईक, मित्र आणि सहकाऱ्यांशी वर्तणूक करताना सावधगिरी बाळगा. प्रवास फलदायी होणारा नसल्यानेच तो टाळावा. लहानशा मुद्द्यावरून वाद होतील. निष्काळजीपणा आणि दुर्लक्ष यामुळे या काळात अडचणी निर्माण होतील. प्रवास टाळावा. या कालावधीत तुमचे एकूणच वर्तन साधारण राहील. तुम्ही कामातून मिळणाऱ्या फायद्यापेक्षा कामाकडे अधिक लक्ष द्या. या काळात काही समस्या आणि काही आरोग्याचे मुद्दे उपस्थित होतील, ज्यांचा तुमच्या कामावर परिणाम होईल. आव्हाने आणि नव्या घटकांना काळजीपूर्वक हाताळणे गरजेचे आहे. नवीन प्रकल्प हाती घेणे टाळा. तुमचा जुळवून घेण्याचा स्वभाव आणि स्पर्धा यामुळे या काळात तुमच्यासमोर अडथळे निर्माण होतील.

स्त्री वर्ग

हा तुमच्यासाठी फार अनुकूल कालावधी नाही. तुमचे शत्रू तुमची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न करतील. फायदा मिळवून न देणारे काम करावे लागेल. अचानक नुकसान संभवते. तुमची काळजी घ्या. अन्नातून होणाऱ्या विषबाधेमुळे पोटाचे विकार संभवतात. हा अनुकूल काळ नसल्यामुळे कोणत्याही प्रकारचा धोका पत्करू नका. मित्र आणि नातेवाईकांशी लहान-सहान मुद्यांवरून वाद होतील. मोठे निर्णय घेऊ नका. तुम्हाला एखाद्या अशा कामात गुंतावे लागेल, ज्याचा तुम्हाला काहीच फायदा होणार नाही. तुम्ही स्वत:ची काळजी घ्या आणि स्वत:वर जास्त दबाव येऊ देऊ नका, जेणेकरून तुम्ही दीर्घकाळपर्यंत व्यवस्थित काम करू शकाल. काही अपेक्षाभंगाचे प्रसंग घडतील. तुमचे धाडस आणि अंदाज हे तुमचे बलाढ्या गुण आहेत, पण त्यामुळे तुम्हाला थोडा अहंकार चढू शकेल. मोठी गुंतवणूक करू नका, कारण तुमच्या अपेक्षेप्रमाणे त्यातून फायदा होणार नाही. तुमचे मित्र आणि सहकारी यांच्याकडून तुम्हाला योग्य सहकार्य मिळणार नाही. कुटुंबातील व्यक्तींचा दृष्टिकोन वेगळा असू शकेल. आरोग्याच्या कुरबुरी सुरू राहतील आणि तुम्हाला मळमळ, ताप, कानाची दुखणी आणि उलट्या यासारखे विकार संभवतात. आक्रमक होऊ नका कारण आक्रमकपणामुळे तुम्ही अडचणीत सापडू शकता. मित्रांसोबत वाद, भांडणे होण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यांच्याशी सलोख्याचे संबंध ठेवण्याचा प्रयत्न करा, तसे नाही झाले तर तुमच्या नात्यात दुरावा निर्माण होऊ शकतो. आर्थिक चढ-उतार संभवतात. परिवारातील एकोपा आणि सामंजस्यात अभाव होण्याची शक्यता. आरोग्याची काळजी घ्या. डोकेदुखी, डोळ्याचे विकार, पोटाचे विकार, पायाला सूज येणे या आजारांवर ताबडतोब उपचार करा.

विद्यार्थी वर्ग

विद्यार्थ्यांसाठी  हे वर्ष मध्यम फलदायी राहील. शैक्षणिक संस्थांमुळे विद्यार्थ्यांना अभ्यासात अडचणी येऊ शकतात आणि ते एकाग्र होऊ शकणार नाहीत. संशोधन आणि पीएचडी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हे वर्ष चांगले राहील, त्यांना गोष्टी खोलवर जाणून घेण्याची अधिक इच्छा असेल. वर्षाच्या मध्यातील काळ विद्यार्थ्यांसाठी खूप आव्हानात्मक असेल. स्पर्धा परीक्षेत यश मिळवण्यासाठी सर्व अडथळे दूर करून लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न करा. अन्यथा कमी गुण तुम्हाला मानसिक तणाव देऊ शकतात. शाळेतील विद्यार्थ्यांना शिकण्यात आणि लक्षात ठेवण्यात अडथळे येऊ शकतात परंतु प्रयत्नरत राहा, ज्यामुळे तुम्हाला खूप मदत होईल.

Advertisement
Tags :

.