For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

वार्षिक राशिभविष्य 2024 : कुंभ

09:52 AM Jan 11, 2024 IST | Tarun Bharat Portal
वार्षिक राशिभविष्य 2024   कुंभ
Advertisement

आत्मविश्वासामुळे व्यक्तिगत आणि व्यावसायिक आयुष्य उत्तम राहते. कोणतीही परिस्थिती उद्भवली तरीही त्यावर मात करणे व्यवस्थित जमते. दिलदार स्वभाव असल्याने कंजुसी जमत नाही. पटकन विश्वास ठेवत असल्याने त्यांच्या चांगुलपणाचा अनेकजण फायदा उठवतात. या व्यक्ती सहसा कोणाचे मन दुखवत नाहीत.

Advertisement

  • राशीस्वामी - शनी
  • शुभवार - शनिवार
  • अशुभ वार - गुरुवार
  • घात मास -  चैत्र
  • शुभ रंग - निळा
  • भाग्यरत्न - नीलम
  • आराध्य देवता - श्री शनि

आत्मविश्वास हा अत्यंत ठासून भरलेला असतो. यामुळेच त्यांचे व्यक्तिगत आणि व्यावसायिक आयुष्य हे उत्तम राहते. या राशीवर जन्मलेल्या जास्तीत जास्त व्यक्ती या बुद्धिमानच असतात. त्यामुळे लेखन, परीक्षण आणि तांत्रिकी क्षेत्रामध्ये या व्यक्तींचा बोलबाला दिसून येतो. यांच्या व्यक्तिमत्त्वात एक प्रकारे चमक असते. पण या व्यक्तींना स्वत:बद्दल काहीच जाणीव नसते. कुंभ राशीच्या व्यक्ती आपली बुद्धी नको त्या गोष्टीत खर्च करत नाहीत. एका गोष्टीवर लक्ष केंद्रीत करून मगच ती गोष्ट मिळविण्याच्या मागे लागतात. या व्यक्ती जितक्या लाजाळू असतात तितक्याच रोमँटिकदेखील असतात. प्रेम या भावनेवरच या व्यक्तींचे प्रेम अधिक असते. आपली सर्व संवेदनशीलता आणि काळजी प्रेमामध्ये या व्यक्ती दाखवतात. त्यामुळे यांना बरेचदा प्रेमात धोकाही मिळतो. या व्यक्तींना प्रेम व्यक्त करण्यासाठी शब्द, विचार आणि इतर गोष्टींची मदत लागत नाही. कारण यांना आपल्या जोडीदाराचे विचार त्यांच्या कृतीतूनदेखील समजतात. या व्यक्ती नेहमी एकमेकांपासून प्रभावित असतात. या व्यक्ती अत्यंत शांत असून विचार करणाऱ्या असतात. या व्यक्तींप्रमाणे स्वत:वर नियंत्रण ठेवणे फारच कमी जणांना जमते. कोणतीही परिस्थिती उद्भवली तरीही त्या परिस्थितीवर मात करणे या व्यक्तींना व्यवस्थित जमते. कुंभ राशीच्या व्यक्ती या अधिकतम दिलदार स्वभावाच्या असतात. कंजुसी करणे जमत नाही. दोन्ही हातांनी पैसे उधळणे आणि प्रसिद्धी मिळवणे यासाठीच या व्यक्ती जन्माला येतात, असं म्हणावं लागेल. कोणत्याही व्यक्तीवर पटकन विश्वास ठेवणे, हा या व्यक्तींचा दोष आहे. त्यामुळे यांच्या चांगुलपणाचा अनेक लोक फायदा उचलतात. त्याशिवाय यांच्या भावनाही दुखावल्या जातात. नशीबापेक्षा कर्मावर विश्वास ठेवणे या लोकांना अधिक आवडते. कोणत्याही कपटी माणसांपासून दूर राहणे या व्यक्तींना जास्त योग्य वाटते. कोणाचेही मन दुखावणे शक्य होत नाही. तसंच कोणी यांचे मन दुखावले तरीही त्यांना चालत नाही. कुंभ राशीच्या व्यक्ती आपली बुद्धी नको त्या गोष्टीत खर्च करत नाहीत. या व्यक्ती जितक्या लाजाळू तितक्याच रोमँटिकदेखील असतात. प्रेम या भावनेवरच या व्यक्तींचे प्रेम अधिक असते. आपली सर्व संवेदनशीलता आणि काळजी प्रेमामध्ये दाखवतात.

ग्रहमान

Advertisement

राशीचा स्वामी शनी महाराज वर्षाच्या सुरुवातीपासून वर्षाच्या शेवटपर्यंत तुमच्या प्रथम भावात असेल. मजबुती येईल. तुमची निर्णयक्षमता उत्तम होईल. तुम्ही आपल्या गोष्टींवर ठाम असाल. जीवनात अनुशासनाला महत्व द्याल. मेहनत करणे पसंत कराल. श्री शनिदेवाच्या बीज मंत्राचा योग्य प्रकारे जप करावा. गुरु 1 मे पर्यंत तुमच्या तिसऱ्या भावात राहून त्यानंतर बृहस्पती महाराज तुमच्या चतुर्थ भावात येतील. गुरुची दोन्ही भ्रमणे तितकीशी शुभ राहणार नाहीत. चालू स्थितिमध्ये फारसा फरक पडणार नाही. परंतु फारसा त्रास जाणवणार नाही. सुखस्थानातील गुरुमुळे घर जमीन यापासून फायदा होऊ शकतो. तुमच्या वैवाहिक जीवनाला सांभाळण्याचा प्रयत्न कराल. तुम्ही दान पुण्यासारख्या कामात स्वेच्छेने आणि आनंदाने हिस्सा घ्याल. राहु आणि केतु वर्षभर तुमच्या दुसऱ्या आणि अष्टम भावात राहिल्याने स्वास्थ्य समस्यांना घेऊन थोडी काळजी घ्यावी लागेल. उलट सुलट भोजनामुळे आणि विचार न करता बोलण्याने तुम्हाला समस्या येऊ शकतात. राहुमुळे भावंडांशी वाद-विवाद किंवा अबोला येऊ शकतो. केतूचे भ्रमण तितकेसे शुभ नाही. किंबहुना त्रासदायकच ठरते. प्रवास करावा लागणार. ओळखीच्या लोकांपासून भाग्योदय किंवा हानीसुद्धा होऊ शकते. साडेसाती चालू आहे. त्यामुळे आरोग्याची विशेष काळजी घ्या. आर्थिक व्यवहार करतानासुद्धा काळजी घ्यावी. कोणालाही मदत करू नका व मदत घेऊ नका. दुसऱ्या भावात पूर्ण वर्ष राहूची उपस्थिती असल्याने वाणीमध्ये कटुता आणि आपल्या स्वार्थ भावनेच्या कारणाने तुमच्या कौटुंबिक संबंधात चढ-उताराची स्थिती बनू शकते आणि परिजनांसोबत नाराजी होऊ शकते. विवाहेच्छुकांसाठी मेपर्यंतच गुरुबळ आहे नंतर वर्षभर वाट पाहावी लागणार आहे.

नोकरदार

तुमच्या कामाच्या ठिकाणी स्पर्धा निर्माण झाल्यामुळे आणि कामाच्या दबावामुळे तुमच्या कारकीर्दीमध्ये काही अडथळे निर्माण होतील. ही परिस्थिती हाताळण्यासाठी तुम्ही थोडे लवचिक धोरण अवलंबिण्याची गरज आहे. नवे प्रकल्प आणि करिअरमध्ये धोके पत्करू नका. वाद आणि कामाच्या स्वरूपातील बदल टाळा. संवाद साधताना सकारात्मक राहा आणि बोलताना किंवा लिखित स्वरूपात अपमानकारक शब्दांचा वापर करू नका. विरुद्ध लिंगी व्यक्तींसोबतचे तुमचे संबंध सलोख्याचे राहणार नाहीत. जोडीदाराची प्रकृती अस्वस्थ राहील. अनावश्यक प्रवास टाळा. तुम्हाला काही अनपेक्षित दु:ख किंवा कोणताही आधार नसलेल्या आरोपांना सामोरे जावे लागेल. व्यक्तिगत आणि व्यावसायिक आघाडीवर अडथळे निर्माण होतील. कठीण परिस्थिती शांतपणे आणि चातुर्याने हाताळा कारण या कालावधीत घाई करून उपयोग नाही. प्रवास फार लाभदायी ठरणार नाही, त्यामुळे तो टाळावा. तुमच्या कुटुंबाकडून पूर्ण सहकार्य मिळणार नाही. अपत्याशी निगडीत समस्या उद्भवतील. तुम्हाला नामोहरम करण्याची एकही संधी तुमचे शत्रू सोडणार नाहीत. थोडे धाडस दाखवा आणि तुमच्या योग्य निर्णयांना चिकटून राहा. पोटदुखीचा त्रास संभवतो. नाण्याची दुसरी बाजू ही की, थोडेसे वाद आणि जवळच्या व्यक्तीशी विरहाची शक्यता आहे. महत्त्वाची गोष्ट ही की दुसऱ्याच्या भांडणात स्वत:ला गोवून घेऊ नका. तुमचे आरोग्य आणि आर्थिक परिस्थिती धोक्यात असेल. तुम्ही एखाद्या घोटाळ्यात अडकले जाल आणि तुमच्या प्रतिमेला कदाचित थोडासा धक्का पोहोचेल. अचानक धनलाभाची शक्यता आहे पण खर्चही तेवढेच जास्त असतील, हेही लक्षात घ्यावे लागेल. या काळात जरा जास्तच धोकादायक आहे, त्यामुळे सावधगिरी बाळगण्याची आवश्यकता आहे.

स्त्री वर्ग

काही अनपेक्षित समस्या उद्भवतील. नातेवाईकांशी सलोख्याचे संबंध ठेवणे इष्ट राहील. आरोग्याची तपासणी करणे आवश्यक आहे. दीर्घकालीन आजार संभवतो. जोडीदार आणि मुलांच्या आरोग्याची काळजी घ्या. आर्थिक अव्यवहार करू नका. वस्तुस्थिती पडताळूनच उद्योगातील व्यवहार करा. शरीरावर पुरळ येण्याची शक्यता. पैशाचा अपव्यय होईल. प्रेम, रोमान्स आणि आयुष्याकडे पाहण्याचा तुमचा दृष्टिकोन हा फार प्रोत्साहनपर असणार नाही. आयुष्यात येणाऱ्या विविध प्रसंगांना शांतपणे आणि समजूतदारपणे सामोरे जावे, हाच सल्ला आहे. कोणत्याही क्षेत्रात केवळ अंदाजावरून काम करू नका, त्यामुळे ते टाळणेच योग्य राहील. डोळे, प्लीहा या अवयवांशी निगडीत विकार उद्भवण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे तुम्ही या काळात निरुत्साही असण्याची शक्यता आहे. असत्य वागणुकीमुळे तुम्ही स्वत:ला संकटात टाकण्याची शक्यता आहे. या कालावधीत तुमचे एकूणच वर्तन साधारण राहील. तुम्ही कामातून मिळणाऱ्या फायद्यापेक्षा कामाकडे अधिक लक्ष द्या. आव्हाने आणि नव्या घटकांना काळजीपूर्वक हाताळणे गरजेचे आहे. नवीन प्रकल्प हाती घेणे पूर्णपणे टाळा. तुमचा जुळवून घेण्याचा स्वभाव आणि स्पर्धा यामुळे या काळात तुमच्यासमोर अडथळे निर्माण होतील. हा तुमच्यासाठी फार समाधानकारक काळ नाही. अचानक आर्थिक नुकसान संभवते. याचिका किंवा वादामुळे आर्थिक तोटा सहन करावा लागेल. प्रयत्न अयशस्वी ठरल्यामुळे तुम्ही त्रासिक व्हाल. कामाचा दबाव खूप असल्यामुळे प्रचंड कष्ट करावे लागतील. कुटुंबातही तणावपूर्ण वातावरण असेल. हा कालावधी फार अनुकूल नसल्याने व्यवसायात फार धोका पत्करू नका. तुमचे शत्रू तुमची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करतील. आर्थिक नुकसान संभवते.

विद्यार्थी वर्ग

विद्यार्थ्यांसाठी हे वर्ष संमिश्र फलदायी राहील. विद्यार्थ्यांना अनेक आव्हानांना सामोरे जावे लागेल, परंतु तुम्ही एकाग्र राहिल्यास जीवनात भरपूर यश मिळवू शकाल. परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना नेहमीपेक्षा जास्त मेहनत करावी लागणार आहे. वर्षाच्या मध्यात विद्यार्थ्यांसाठी काही अडचणी निर्माण होत आहेत, त्यामुळे त्यांना खूप संघर्ष करावा लागू शकतो. साहित्य आणि मानसशास्त्राच्या विद्यार्थ्यांना त्यांचे प्रयत्न अधिक तीव्र करण्याचा सल्ला दिला जातो. परदेशात शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांची इच्छा मेनंतर पूर्ण होऊ शकते. वर्षाची सुरुवात  काहीशी कमजोर राहण्याची शक्यता आहे. तुम्ही अभ्यासात मन केंद्रित करण्याचा प्रयत्न केला तरी तुमचे मन कुठल्या न कुठल्या समस्येत राहील, यामुळे शिक्षणावर लक्ष देणे तुमच्यासाठी कठीण होईल.

Advertisement
Tags :

.