For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कलंबिस्त इंग्लिश स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन संपन्न

12:37 PM Dec 15, 2024 IST | अनुजा कुडतरकर
कलंबिस्त इंग्लिश स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन संपन्न
Advertisement

सावंतवाडी । प्रतिनिधी

Advertisement

कलंबिस्त इंग्लिश स्कूल, कलंबिस्तचे वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहात संपन्न झाला.यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सावंतवाडी संस्थानचे राजे खेमसावंत भोसले तर प्रमुख अतिथी म्हणून सावंतवाडी नगरपरिषदेचे माजी उपनगराध्यक्ष राजनजी पोकळे,माध्यमिक शिक्षणाधिकारी कविता शिंपी, सिंधुदुर्ग जिल्हा बँक संचालक रविंद्र मडगावकर उपस्थित होते.याचबरोबर संस्था अध्यक्ष शिवाजीराव सावंत, उपाध्यक्ष गोविंद लिंगवत,सचिव यशवंत राऊळ,सहसचिव चंद्रकांत राणे,सैनिक पतसंस्था चेअरमन बाबूराव कविटकर,कुणकेरी माजी सरपंच शशिकांत सावंत, ओटवणे माजी सरपंच म्हापसेकर, संस्था संघटनेचे पदाधिकारी काका मांजरेकर, संस्था संचालक सुरेश राऊळ,शंकर राऊळ,शशिकांत धोंड, वसंत सावंत,कॅप्टन सुभाष सावंत,सूर्यकांत राजगे, कलंबिस्त सरपंच सपना सावंत,उपसरपंच सुरेश पास्ते, वेर्ले सरपंच रुचिता राऊळ,सावरवाड सरपंच देवयानी पवार,शिरशिंगे सरपंच दीपक राऊळ, कलंबिस्त पोलीस पाटील प्रियांका सावंत,ओवळीये माजी सरपंच बैजू सावंत, पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष शंकर पावसकर,कास्ट्राईब संघटनेचे जिल्हाध्यक्ष संजय पेंडूरकर, माध्यमिक शिक्षण विभाग अधिक्षिका शलाका तांबे,अधिक्षक घोगळे, शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे वैभव केंकरे,दिपक हरयाण आदी उपस्थित होते.यावेळी मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलनाने कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले व प्रशालेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा विविध पारितोषिके देऊन गौरव करण्यात आला. माता पालकांसाठी आयोजित आईकडून मुलांच्या अपेक्षा या विषयावरील पत्रलेखन स्पर्धेतील उत्कृष्ट पत्रलेखन करणाऱ्या सुचिता विलास वर्दम यांचाही सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी बोलताना प्रमुख अतिथी राजनजी पोकळे यांनी आमदार दिपकभाई केसरकर यांचेवतीने या स्नेहसंमेलन सोहळ्यास शुभेच्छा देत या पंचक्रोशीशी असलेले आमदार दिपकभाईंचे नाते वृद्धिंगत करण्यासाठी येथे एक बहुउद्देशीय सभागृह उभारणीचे काम लवकरच केले जाणार असल्याचे जाहीर केले. तसेच सिंधुदुर्ग बॅंक संचालक रविंद्र मडगावकर यांनी प्रशालेच्या उत्तरोत्तर होत असलेल्या गुणवत्तापूर्ण प्रगतीबद्दल गौरवोद्गार काढले व कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या. माध्यमिक शिक्षणाधिकारी कविता शिंपी यांनी कलंबिस्त सारख्या ग्रामीण भागात अशा प्रकारची शैक्षणिक संस्था गेली अनेक दशके ज्ञानदानाचे पवित्र कार्य करून सातत्याने उपक्रमशील असणाऱ्या या शाळेचे कौतुक केले व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. आपल्या अध्यक्षीय भाषणात सावंतवाडी संस्थानचे राजे खेमसावंत भोसले यांनी शाळा व संस्थेच्या विविधांगी उपक्रमांचे कौतुक केले.यावेळी संस्थेच्या व शाळेच्या. वतीने राजे खेमसावंत भोसले, राजनजी पोकळे, शिक्षणाधिकारी कविता शिंपी मॅडम, वरीष्ठ लिपिक विष्णू पास्ते यांचा सत्कार करण्यात आला.उपस्थितांचे स्वागत, प्रास्ताविक व अहवाल वाचन प्रशालेचे मुख्याध्यापक अभिजीत जाधव यांनी, सुत्रसंचलन किशोर वालावलकर तर आभार प्रदर्शन विलास चव्हाण यांनी केले. यावेळी माता पालकांसाठी आयोजित करण्यात आलेल्या खेळ पैठणीच्या कार्यक्रमातील विजेती दक्षता दशरथ पवार यांचा पैठणी देऊन शिक्षणाधिकारी शिंपी मॅडम यांचे हस्ते सत्कार करण्यात आला. यानंतर विद्यार्थ्यांचा विविध गुणदर्शन कार्यक्रम “उत्कर्ष 2024” निवेदक शुभम धुरी यांच्या साथीने अत्यंत रंगतदार व उत्साहाने साजरा झाला. या स्नेहसंमेलन सोहळ्यास पंचक्रोशीतील प्रतिष्ठित नागरिक, आजी-माजी सैनिक, शिक्षक, शिक्षणप्रेमी पालक व आजी-माजी विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.

Advertisement

Advertisement
Tags :

.