For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

युनियन जिमखान्याची वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत

10:26 AM Oct 05, 2024 IST | Tarun Bharat Portal
युनियन जिमखान्याची वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत
Advertisement

बेळगाव : कॅम्प येथील युनियन जिमखान्याची 88 वी वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच पार पडली. अध्यक्षस्थानी युनियन जिमखानाचे अध्यक्ष चंद्रकांत बांडगी होते. व्यासपीठावर उपाध्यक्ष संजय पोतदार, सचिव प्रसन्ना सुंठणकर, संचालक संजय चव्हाण, संजय मोरे, चेतन बैलूर, विठ्ठल गवस तसेच इतर सर्व सभासद उपस्थित होते. प्रारंभी चंद्रकांत बांडगी यांनी वार्षिक अहवाल सादर केला. यावेळी उपस्थित सभासदांनी अनुमोदन दिले. तसेच गतवर्षी युनियन जिमखान्यातर्फे आयोजित  विविध उपक्रमांची माहिती दिली. यावेळी पुनर्निर्वाचित बिनविरोध संचालकपदी निवड झालेल्या संजय चव्हाण व सुधाकर पाटणकर यांचा अध्यक्ष चंद्रकांत बांडगी यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.

Advertisement

Advertisement
Tags :

.