महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

रामकृष्ण मिशनतर्फे उद्यापासून वार्षिकोत्सव

11:30 AM Feb 15, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

रविवारी ‘गीतरामायण’ कार्यक्रमाचे आयोजन

Advertisement

बेळगाव : रामकृष्ण मिशन आश्रम बेळगावच्यावतीने ‘20 वा वार्षिकोत्सव’ 16 ते 18 फेब्रुवारीदरम्यान आयोजित केला आहे. किल्ला येथील रामकृष्ण मिशन आश्रमात होणाऱ्या या महोत्सवामध्ये युवावर्ग, प्राध्यापक व सामान्य नागरिकांसाठी विविध कार्यक्रम आयोजित केले आहेत. या महोत्सवात पुणे येथील गीतरामायण कार्यक्रम होणार असल्याने भाविकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावावी, असे आवाहन बेळगाव रामकृष्ण मिशनचे प्रमुख मोक्षात्मानंदजी महाराज यांनी पत्रकार परिषदेवेळी केले. शुक्रवार दि. 16 रोजी युवावर्गासाठी सकाळी 10 ते 1.30 या वेळेत युवा संवाद होणार आहे. शनिवार दि. 17 रोजी सकाळी 10 ते 1.30 या वेळेत शिक्षकांसाठी परिसंवाद होईल. रविवार दि. 18 रोजी सकाळी 10 ते दुपारी 1.30 या वेळेत आध्यात्मिक संमेलन होणार आहे. यावेळी राजकोट-गुजरात येथील स्वामी निखिलेश्वरानंदजी महाराज, बेंगळूर येथील स्वामी वीरेशानंदजी व बेंगळूर येथील डॉ. एच. एन. मुरलीधर स्वामीजी मार्गदर्शन करणार आहेत. रामकृष्ण मिशनच्यावतीने आध्यात्मिक कार्यासोबतच शैक्षणिक कार्य केले जात आहे. किल्ला येथील रामकृष्ण मिशन आश्रमात स्टडी सेंटर सुरू करण्यात आले आहे. गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना मोफत संगणक प्रशिक्षण दिले जाते.  व्यक्तिमत्त्व विकास, एकाग्रता व ध्यानधारणा यासाठी शिबिरे घेतली जात असल्याची माहिती स्वामीजींनी दिली.

Advertisement

रविवारी होणार गीतरामायण

रविवार दि. 18 रोजी सायंकाळी 6 ते 8 या वेळेत पुणे येथील गीतरामायण हा मराठी कार्यक्रम होणार आहे. दत्ता चितळे व त्यांचे सहकारी गीतरामायणातील अजरामर गाणी सादर करणार आहेत. दत्ता चितळे यांनी यापूर्वी दोन वेळा अयोध्या येथे गीतरामायणाचा कार्यक्रम केला आहे.या कार्यक्रमानंतर महाप्रसादाचे वितरण केले जाणार आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article