महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

फुकेरी येथील वैजा माऊलीचा आज वार्षिक जत्रोत्सव

02:41 PM Dec 20, 2024 IST | अनुजा कुडतरकर
Advertisement

दुर्गमस्थान असुनही भाविकांची होणार गर्दी

Advertisement

ओटवणे प्रतिनिधी

Advertisement

दुर्गमस्थानी असलेल्या फुकेरी गावचे ग्रामदैवत श्री वैजा माऊली देवस्थानचा वार्षिक जत्रोत्सव आज होत आहे. नवसाला पावणारी आणि माहेरवाशिणीची पाठीराखी अशी वैजा माऊलीची ख्याती असल्याने या जत्रोत्सवासाठी भाविकांची अलोट गर्दी होते. यानिमित्त आज मंदिरात सकाळी धार्मिक कार्यक्रम आटोपल्यानंतर कुळघराकडून सवाद्य देवतांचे आगमन झाले. त्यानंतर देवीला भरजरी वस्त्र व सुवर्ण अलंकारांसह आकर्षक फुलांनी सजविण्यात आले. यावेळी देवस्थानच्या मानकऱ्यांच्या उपस्थितीत देवीची मानाची ओटी भरण्यात आली यानिमित्त रात्री १० वाजता लोटांगण व सवाद्य पालखी मिरवणूक आणि पावणीचा कार्यक्रम होणार आहे. रात्री उशिरा सुधीर कलिंगण प्रस्तुत कलेश्वर दशावतार कंपनीचे नाटक होणार आहे. शनिवारी सकाळी लघुरुद्र, अभिषेक तर दुपारी महाप्रसादाचा कार्यक्रम होणार आहे. भाविकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन देवस्थानचे मानकरी आणि फुकेरी ग्रामस्थांनी केले आहे.

Advertisement
Tags :
# tarun bharat sindhudurg # news update # konkan update #
Next Article