सातुळी सातेरीचा आज वार्षिक जत्रोत्सव
04:30 PM Jan 03, 2024 IST
|
अनुजा कुडतरकर
Advertisement
ओटवणे प्रतिनिधी
दाणोली नजिक सातुळी गावचे ग्रामदैवत श्री देवी सातेरीचा वार्षिक जत्रोत्सव बुधवारी होत आहे.नवसाला पावणारी आणि माहेरवाशिणींची पाठीराखी अशी सातेरीची ख्याती असल्याने या जत्रोत्सवासाठी भाविकांची अलोट गर्दी होते.यानिमित्त मंदिरात सकाळी यादिवशी देवीच्या दर्शनासह देवीची ओटी भरण्यासाठी रात्री उशिरापर्यंत भाविकांची गर्दी होणार आहे. रात्री उशिरा सवाद्य पालखी मिरवणूकीनंतर फटाक्यांच्या आतषबाजीत खानोलकर दशावतार कंपनीचे नाटक होणार आहे. भाविकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन देवस्थानचे मानकरी तसेच सातुळी ग्रामस्थांनी केले आहे.
Advertisement
Advertisement
Advertisement
Next Article