महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

‘रेड 2’ चित्रपटाची घोषणा

06:37 AM Sep 26, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

अजय देवगण पुन्हा मुख्य भूमिकेत

Advertisement

बॉलिवूडच्या अॅक्शन हिरोंमध्ये अजय देवगणचे नाव सामील आहे. शैतान आणि मैदान या चित्रपटानंतर अजयचा आगामी चित्रपट ‘रेड 2’ची घोषणा करण्यात आली आहे. 2018 मध्ये राजकुमार गुप्ता यांच्या दिग्दर्शनाखालील ‘रेड’ चित्रपट प्रदर्शित झाला होता. आता याच्या सीक्वेलची घोषणा करण्यात आली आहे. रेड 2 या चित्रपटात अजय देवगण पुन्हा एकदा आयआरएस अधिकारी अमय पटनायक ही व्यक्तिरेखा साकारत भ्रष्ट लोकांना धडा शिकविताना दिसून येणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शनही राज कुमार गुप्ताच करणार आहेत. या चित्रपटात रितेश देशमुख हा खलनायकाच्या भूमिकेत असणार आहे. हा चित्रपटही प्राप्तिकर विभागाच्या कारवाईवर आधारित असणार आहे. चित्रपटात अजय आणि रितेशसोबत वाणी कपूर तसेच रजत कपूर दिसून येणार आहे. हा चित्रपट 21 फेब्रुवारी रोजी प्रदर्शित करण्याची तयारी आहे. चित्रपटाचे चित्रिकरण लखनौ आणि दिल्लीत पार पडणार आहे.

Advertisement

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article