For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

विजय देवरकोंडाच्या नव्या चित्रपटाची घोषणा

06:43 AM May 04, 2026 IST | Tarun Bharat Portal
विजय देवरकोंडाच्या नव्या चित्रपटाची घोषणा
Advertisement

दाक्षिणात्य अभिनेता विजय देवरकेंडाने स्वत:च्या नव्या चित्रपटाची घोषणा केली आहे. याचे नाव सध्या व्हीडीएक्सशौर्यव ठेवण्यात आले आहे. हा चित्रपट विजयने शौर्यवसोबत मिळून तयार केला आहे, शौर्यवला ‘हाय नाना’साठी ओळखले जाते.  विजयने एक पोस्ट करत या चित्रपटाच्या टीमची ओळख स्वत:च्या चाहत्यांना करून दिली आहे.

Advertisement

या घोषणेच्या पोस्टरमध्ये विजय दिसून येत आहे. हा  प्रोजेक्ट एका पौराणिक कहाणीवर आधारित असावा, यामुळे तो आंतरराष्ट्रीय स्तराच्या निर्मात्यांसोबत निर्माण केला जात आहे. या चित्रपटात एक आंतरराष्ट्रीय तज्ञांची टीम जोडली गेली असून यात सिनेमॅटोग्राफर अलेजांद्रो मार्टिनेज सामील आहेत. त्यांना ‘हाउस ऑफ द ड्रॅगन’मधील स्वत:च्या कामासाठी ओळखले जाते. तर एक व्हीएफएक्स टीम असून ती यापूर्वी ‘स्नोपियर्सर’ आणि ‘बॅटमॅन फॉरएव्हर’ यासारख्या चित्रपटांशी जोडलेली राहिली आहे. चित्रपटाला संगीत हेशम अब्दुल वहाब देणार आहेत.

विजय याचबरोबर ‘रणबाली’वर काम करत असून त्याचे दिग्दर्शन राहुल सांकृत्यानकडून केले जात आहे. हा चित्रपट एक ऐतिहासिक अॅक्शन ड्रामा आहे. 1854-1878 दरम्यानच्या पार्श्वभूमीवर निर्मित या चित्रपटात रश्मिका मंदाना मुख्य भूमिकेत आहे. हॉलिवूड अभिनेता अर्नोल्ड वोस्लू यात खलनायकाच्या भूमिकेत आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.