‘चुंबक’ वेबसीरिजची घोषणा
कॉमेडी अन् ड्रामाचा भरपूर डोस
नीना गुप्ता यांची सीरिज ‘चुंबक’ चालू महिन्यात प्रदर्शित होणार आहे. या सीरिजमध्ये गल्लीतील आसपासच्या घरांदरम्यान पारिवारिक अन् आपुलकीचे नाते दाखविण्यात येणार आहे. शेजारी कशाप्रकारे सुख अन् दु:खात साथ देतात, सामानाचे आदानप्रदान कशाप्रकारे चालते, याची झलक या सीरिजमध्ये पाहता येणार आहे. चुंबक सीरिज नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. 28 ऑगस्टपासून ही सीरिज पाहता येणार आहे. ‘नेटफ्लिक्स फॅमिलीमध्ये आणखी एका फॅमिलीची भर पडणार आहे, चुंबक परिवाराला भेटा, असे नीना गुप्ताने सोशल मीडिया पोस्टमध्ये नमूद केले आहे. या सीरिजमध्ये नीना गुप्ता यांच्यासोबत देवेन भोजानी, अमायरा दस्तूर, अर्जुन बिजलानी, अनंत व्ही. जोशी आणि हेली शाह हे कलाकार दिसून येणार आहेत. समकालीन शहरी भारतीय शेजारात स्थापित संस्कृती या सीरिजच्या माध्यमातून रंजक पद्धतीने दर्शविण्यात येणार आहे. शेजारात कुठलाही उत्सव छोटा राहत नाही, कुठलीच समस्या कधीच वैयक्तिक राहत नाही. दिग्दर्शक-लेखक आतिश कपाडिया अन् निर्माते जेडी मजेठिया ही सीरिज घेऊन येत आहेत. यापूर्वी या जोडीने ‘साराभाई व्हर्सेस साराभाई’ आणि ‘खिचडी’ असे शो दिले आहेत.