‘द ममी 4’ चित्रपटाची घोषणा
20 वर्षांनी एकत्र दिसणार ब्रेंडन फ्रेजर अन् राहेल वीज
जवळपास 20 वर्षांनी ‘द ममी’ फ्रेंचाइजीचा चौथा चित्रपट मोठ्या पडद्यावर येणार आहे. यात ब्रेंडन फ्रेजर आणि राहेल वीज परतणार आहेत. युनिव्हर्सल पिक्चर्सनी ‘द ममी 4’च्या प्रदर्शनाची घोषणा केली आहे. द ममी 4 चित्रपट 19 मे 2028 रोजी प्रदर्शित होणार आहे.
चित्रपटात ब्रेंडन फ्रेजर पुन्हा एकदा रिक ओ कोनेल ही भूमिका साकारणार आहे. तर राहेल वीज ही एवलिन कार्नाहन ही भूमिका साकारले. यामुळे चाहत्यांना आनंद होत असून जुन्या आठवणी ताज्या होत आहेत. चित्रपटाच्या कहाणीविषयी अद्याप कुठलाच तपशील देण्यात आलेला नाही त्पण मागील चित्रपटांची जबरदस्त लोकप्रियता पाहता सर्व चाहते अत्यंत उत्साहीत आहेत.
द ममी सीरिजची सुरुवात 1932 मधील चित्रपटाद्वारे झाली होती. परंतु 1999 मध्ये ब्रेंडन फ्रेजर आणि राहेल वीज यांच्या नव्या चित्रपटाने अॅक्शन, कॉमेडी आणि भीतीदायक रोमांचचे मिश्रण सादर केले आणि जगभरात स्वत:चे चाहते निर्माण केले होते.
1999 मधील चित्रपट द ममीमध्ये एवलिन ही चुकून इम्होतेपला जागृत करते. तर 2001 च्या द ममी रिटर्न्स चित्रपटात इम्होतेपला परत आणण्यचा प्रयत्न नवा धोका निर्माण करत असल्याचे दाखविण्यात आले होते. 2008 च्या ‘द ममी : टॉम्ब ऑफ द डॅगन एम्परर’मध्ये चिनी सम्राटाचा धोका दाखविण्यात आला होता, यात एवलिनची भूमिका बदलण्यात आली होती.
आता नवा चित्रपट ‘द ममी 4’ला रेडियो सायलेन्सचे दिग्दर्शन मॅट बेटिनेली-ओल्पिन आणि टायलर गिलेट दिग्दर्शित करत आहेत. तर याची पटकथा डेविड कॉगेशल लिहिणार आहेत. ब्रेंडन फ्रेजर स्वत: याचा कार्यकारी निर्माता आहे. हा चित्रपट अॅक्शन, अॅडव्हेंचर आणि जुन्या मजेशीर केमिस्ट्रीसह परतणार आहे.