For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

‘नाम-टू लिव इज वॉर’ चित्रपटाची घोषणा

06:07 AM Jun 29, 2026 IST | Tarun Bharat Portal
‘नाम टू लिव इज वॉर’ चित्रपटाची घोषणा
Advertisement

वीर पहाडिया मुख्य भूमिका

Advertisement

‘नाम-टू लिव इज वॉर’ या चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. यात वीर पहाडिया मुख्य भूमिकेत दिसून येणार आहे. या चित्रपटाची निर्मिती महेश भट्ट करणार आहे. तर दिग्दर्शनाची धुरा सिद्धांत सचदेव सांभाळणार आहे. चित्रपटात वरुण शर्मा देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसून येणार आहे.

वरुण शर्माने एक पोस्ट शेअर केली असून यात काही छायाचित्रे सामील आहेत. ‘जेव्हा शहर आजारी पडते, तेव्हा औषध अन् विषात फरक करणे अवघड ठरते’ अशी कॅप्शन या पोस्टला देण्यात आली आहे. वीर पहाडियाने देखील एक पोस्ट शेअर केली आहे. ‘सर्वात छोटा जीव देखील सर्वात मोठ्या शक्तीचा पुरावा असतो असे बोलले जते. जेव्हा बाप्पाचा आशीर्वाद सोबत असतो तेव्हा प्रत्येक ‘नाम’ एक वादळ असते’ असे वीरने स्वत:च्या पोस्टमध्ये नमूद केले आहे. नाम हा एक डार्क अॅक्शन थ्रिलरपट असल्याचे सांगण्यात येत आहे. यात वीर दमदार आणि रफ-टफ अवतारात दिसून येणार आहे.

Advertisement

महेश भट्ट यांच्या मार्गदर्शनात हा प्रवास सुरू करण्याचे सौभाग्य प्राप्त झाले आहे. वीर पहाडिया आणि वरुण शर्मासोबत मिळून या दमदार कहाणीला मोठ्या पडद्यावर साकारण्यासाठी उत्साही असल्याचे उद्गार सिद्धांत सचदेव याने काढले आहेत.

Advertisement
Tags :

.