3 मंकीज’ चित्रपटाची घोषणा
बॉलिवूड अभिनेता अर्जुन रामपालने ‘धुरंधर’मध्ये मेजर इक्बालची भूमिका साकारली होती, ज्याला लोकांची मोठी पसंती मिळाली होती. आता अभिनेत्याच्या नव्या थ्रिलरपटाची घोषणा झाली असून याचे नाव ‘3 मंकीज’ आहे. या चित्रपटात अर्जुनसोबत विशाल जेठवा, मुस्तफा बर्मावाला आणि तेनजिन दल्हा देखील दिसून येणार आहेत.
या चित्रपटाचे दिग्दर्शन अब्बास-मस्तान यांनी केले आहे. याच्या मोशन पोस्टरमध्ये चित्रपटातील मुख्य व्यक्तिरेखांची झलक दाखविण्यात आली आहे, परंतु कहाणीवरून अधिक माहिती समोर आलेली नाही.
‘3 मंकीज’मध्ये पारंपरिक लाइन ‘बुरा मत देखो, बुरा मत सुनो, बुरा मत बोलो’ला बदलून ‘सब देखो, अपनी सुनो, बेखौफ बोलो’ वापरण्यात आली आहे. चित्रपटाच्या कहाणीत तीन चेहरे झाकलेल्या व्यक्तिरेखा अमर, अकबर आणि अँथोनी आहेत. या तिन्ही भूमिका विशाल जेठवा, मुस्तफा बर्मावाला आणि तेनजनि दल्हा यांनी साकारल्या आहेत. तर अर्जुन रामपालने चित्रपटात संजय ही भूमिका साकारली आणि या तिघांसोबत त्याचा कोणता संबंध आहे याचा खुलासा सध्या करण्यात आलेला नाही. 3 मंकीज या चित्रपटाची निर्मिती अल्लारखा वोहरा, फारुक वोहरा आणि सईद वोहरा यांनी केली आहे. हा चित्रपट 4 डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.
