For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

प्रहार द उज्ज्वल निकम स्टोरीची घोषणा

06:39 AM Jun 23, 2026 IST | Tarun Bharat Portal
प्रहार द उज्ज्वल निकम स्टोरीची घोषणा
Advertisement

मॅडॉक फिल्म्सच्या आणखी एका चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. राजकुमार राव या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहे. ‘प्रहार-द उज्ज्वल निकम स्टोरी’ चित्रपट ऑगस्ट महिन्यात सुरू होणार आहे. दिनेश विजान आणि  राजकुमार राव या चित्रपटाच्या निमित्ताने पुन्हा एकत्र आले आहेत. हा चित्रपट 7 ऑगस्ट रोजी प्रदर्शित केला जाणार असल्याची घोषणा दिनेश विजान यांच्याकडून करण्यात आली आहे.

Advertisement

मॅडॉक फिल्म्सच्या ‘प्रहार’मध्ये राजकुमार रावसोबत वामिका गब्बी, सिकंदर खेर आणि जयदीप अहलावत यासारखे कलाकारही प्रमुख भूमिकांमध्ये दिसून येणार आहेत. चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी अविनाश अरुण सांभाळत आहेत. हा चित्रपट एक ‘बायोग्राफिकल’ स्वरुपाचा आहे.

हा चित्रपट देशातील सर्वात प्रसिद्ध वकिलांपैकी एक उज्ज्वल निकम यांच्या आयुष्यावर आधारित असणार आहे. राजकुमार रावने या चित्रपटाकरता मोठी मेहनत घेतली आहे. कुठल्याही प्रकारचा बनावट मेकअप किंवा प्रोस्थेटिक्सशिवाय त्याने स्वत:चे वजन वाढवून व्यक्तिरेखेकरता तयारी केली आहे. जोपर्यंत स्वत:च्या मेहनतीने तो लुक मिळवू शकतो, तोपर्यंत मी प्रोस्थेटिक्समध्ये विश्वास ठेवत नाही. निकम यांच्या व्यक्तिरेखेसाठी मी मेहनत घेणे पसंत केल्याचे राजकुमार राव सांगतो.

Advertisement

Advertisement
Tags :

.