For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

‘पुलिस कंपनी’ची घोषणा

07:00 AM Aug 22, 2026 IST | Tarun Bharat Portal
‘पुलिस कंपनी’ची घोषणा
Advertisement

रामगोपाल वर्मांचा नवा प्रोजेक्ट

Advertisement

राम गोपाल वर्मा यांनी स्वत:चा आगामी चित्रपट ‘पुलिस कंपनी’ची घोषणा केली आहे. या चित्रपटाची निर्मिती टी-सीरिज करणार आहे. हा चित्रपट 1990 च्या दशकाच्या अखेरीस अन् 2000 दशकाच्या प्रारंभी मुंबई शहरातील गॅँगच्या कारवाया रोखण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या मुंबई पोलिसांच्या स्क्वाडवर आधारित असणार आहे. या चित्रपटाची टॅगलाइन’ यह डी-कंपनीसे भी ज्यादा खतरनाक है’ अशी आहे. दाऊद इब्राहिमने स्वत:च्या बहुतांश विरोधी टोळ्यांना संपविण्यासाठी स्वत:च्या गँगला एका कंपनीत बदलले आणि मग दुबईत पळाला आणि डी-कंपनीच्या कामकाजाला सांभाळण्याची जबाबदारी स्वत:चा सहकारी छोटा राजनला सोपविली होती असे राम गोपाल वर्मा यांनी म्हटले आहे.

दाऊद अन् छोटा रोजन वेगळे झाल्यावर मुंबईच्या अंडरवर्ल्डमध्ये बदल घडून आले आणि टोळ्यांच्या कारवाया वाडल्या. यानंतर मुंबईच्या अंडरवर्ल्डमध्ये एक पोकळी निर्माण झाली, या स्थितीचा लाभ उचलत अनेक इतर टोळ्या मैदानात  उतरल्याने गुन्हेगारी कारवायांमध्ये प्रचंड वाढ झाली. अशास्थितीत स्पेशल स्क्वाड निर्माण करण्यात आले आणि या स्क्वाडने 1997-2004 दरम्यान 300 हून अधिक गँगस्टर्सना संपविले होते. ‘पुलिस कंपनी’ हा चित्रपट स्पेशल स्क्वाड आणि त्यातील सदस्य पोलीस अधिकारी दया नायकवर आधारित असेल. यात हर्षवर्धन राणे हा नायक यांच्यामुळे प्रेरित व्यक्तिरेखा साकारणार आहे. चित्रपटात आणखी अनेक मोठे कलाकार असतील असे वर्मा यांनी सांगितले आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.