For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

लोकमान्य मल्टिपर्पज सोसायटीच्या नवीन ठेव योजनेची घोषणा

11:58 AM Oct 04, 2024 IST | Tarun Bharat Portal
लोकमान्य मल्टिपर्पज सोसायटीच्या नवीन ठेव योजनेची घोषणा
Advertisement

बेळगाव : नवरात्र, दसरा आणि दीपावली सणाचे औचित्य साधून लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटी आपल्या खातेदारांसाठी एक नवीन ठेव योजना ‘लोकमान्य दुर्गा-शक्ती’ सुरू करत आहे. ही योजना ग्राहकांसाठी आकर्षक व्याजदरांसह त्यांच्या बचतीला उत्तम परतावा देणारी आहे. लोकमान्य दुर्गा-शक्ती मुदत ठेव योजनेची सुरुवात दि. 3 ऑक्टोबर 2024 पासून होत आहे. 31 डिसेंबर 2024 पर्यंत ती मर्यादित असेल. ठेव मुदत- 18 महिने कालावधीकरिता आहे आणि आकर्षक वार्षिक व्याजदर 10.25 टक्के (साधे व्याज) असा आहे. किमान ठेव- ₨10,000/-. जास्तीत जास्त ठेवीवर मर्यादा नाही. ज्येष्ठ नागरिक, महिला किंवा ₨10 लाख व त्यापेक्षा अधिक ठेवी एकल पावतीधारकांना 0.5 टक्के अतिरिक्त व्याज दिले जाईल, ज्यामुळे व्याज दर 10.75 टक्केपर्यंत जाईल. 2.5 टक्के व्याज कपातीसह मुदतपूर्व ठेव काढण्याची परवानगी आहे. ठेवीवरच्या व्याजदरापेक्षा फक्त 2 टक्के जास्त दराने ठेव रकमेच्या 90 टक्केपर्यंत कर्जाची सुविधा उपलब्ध आहे.

Advertisement

मोफत वैयक्तिक अपघाती मृत्यू पॉलिसी

ठेवीदारास सोसायटीकडून 1,00,000 ऊपये कव्हरची मोफत अपघाती मृत्यू पॉलिसी वर्षभरासाठी दिली जाईल. मुदत ठेव योजनेत वय वर्षे 18 ते 65 पर्यंतच्या व्यक्तींचा समावेश असेल. पॉलिसीचा कालावधी ठेव मुदतीच्या बरोबरीने असेल. योजनेत सहभागी होण्याकरिता आधार आणि पॅनकार्ड अनिवार्य आहे. अधिक माहितीसाठी आपल्या जवळच्या लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटी शाखेशी संपर्क साधावा.

Advertisement

Advertisement
Tags :

.