महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

भारतीय नेमबाज संघाची घोषणा

06:13 AM May 29, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

म्युनिच येथे होणाऱ्या विश्वचषक नेमबाजी स्पर्धेसाठी मंगळवारी येथे अखिल भारतीय रायफल संघटनेतर्फे 23 सदस्यांचा भारतीय नेमबाज संघ जाहीर करण्यात आला. सदर स्पर्धा 31 मे ते 8 जुन दरम्यान होणार आहे.

Advertisement

अलिकडेच झालेल्या ऑलिंपिक निवड चाचणी स्पर्धेतील आघाडीच्या तीन नेमबाजांचा या संघात समावेश आहे. म्युनिचमध्ये होणाऱ्या स्पर्धेत भारतीय नेमबाज ऑलिंपिक स्पर्धेत होणाऱ्या दहा विविध नेमबाजी प्रकारात सहभागी होणार असल्याची माहिती रायफल संघटनेचे वरिष्ठ उपाध्यक्ष कालिकेश नारायणसिंग देव यांने दिली. म्युनिचमधील ही स्पर्धा संपल्यानंतर भारतीय नेमबाज संघातील नेमबाजपटू फ्रान्समध्ये आयोजिलेल्या सराव शिबिरात दाखल होतील. या शिबीरानंतर हे नेमबाज मायदेशी परत येतील. दोन आठवड्यांच्या कालावधीनंतर सदर भारतीय नेमबाज भोपाळमध्ये एकत्र येणार असून त्या ठिकाणी सराव शिबीर काही दिवसांसाठी आयोजित केले आहे. या शिबीरानंतर भारतीय नेमबाज ऑलिंपिक स्पर्धेसाठी पॅरिसला रवाना होतील.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews
Next Article