For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी निवडणुकीची घोषणा

10:15 AM May 21, 2024 IST | Tarun Bharat Portal
विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी निवडणुकीची घोषणा
Advertisement

13 जूनला विधानसभा आमदार करणार मतदान

Advertisement

बेंगळूर : पुढील महिन्यात रिक्त होणाऱ्या विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी निवडणूक घोषणा करण्यात आली आहे. 13 जून रोजी मतदान होणार असून त्याचदिवशी सायंकाळी मतमोजणी करून निकाल जाहीर केला जाणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने सोमवारी विधानसभेवरून विधानपरिषदेसाठी होणाऱ्या निवडणुकीची घोषणा केली आहे. 27 मे रोजी अधिसूचना जारी होणार आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी 3 जून शेवटचा दिवस आहे. 4 जून रोजी अर्ज छाननी होणार असून माघार घेण्यासाठी 6 जून शेवटचा दिवस आहे. विधानसभेवरून विधानपरिषदेवर निवडून आलेले अरविंदकुमार अरळी, एन. एस. बोसराजू, के. गोविंदराज, डॉ. तेजस्विनीगौडा, मुनिराजूगौडा पी. एम., के. पी. नंजुंडी, बी. एम. फारुक, रघुनाथराव मलकापुरे, एन. रविकुमार, एस. रुद्रेगौडा, के.  हरिषकुमार या 11 सदस्यांचा कार्यकाळ 17 जून रोजी संपणार आहे.

Advertisement
Advertisement
Tags :

.