For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अनुपम खेर यांच्या नव्या चित्रपटाची घोषणा

06:31 AM May 16, 2026 IST | Tarun Bharat Portal
अनुपम खेर यांच्या नव्या चित्रपटाची घोषणा
Advertisement

अनुपम खेर यांनी स्वत:च्या नव्या चित्रपटाचे चित्रिकरण सुरू केले आहे. हा त्यांचा 551 वा चित्रपट आहे. यातील त्यांची भूमिका खऱ्या अर्थाने वेगळी राहणार असल्याचे समजते.  स्वत:च्या 4 दशकांहून अधिक मोठ्या कारकीर्दीत अनुपम खेर यांनी साकारलेल्या अनेक भूमिकांचा उल्लेख वारंवार होत असतो. स्वत:च्या 551 व्या चित्रपटाचे खेर यांनी एक पोस्टर शेअर केले असून यात ते लांब पांढऱ्या गाउनमध्ये दिसून येत आहेत.

Advertisement

हा माझा 551 वा चित्रपट, परंतु पुन्हा पहिले पाऊल टाकतोय असेच वाटत आहे. स्व:ला आव्हान न दिल्यास आपण जुन्या गोष्टींची पुनरावृत्ती करू लागतो असे माझे मानणे आहे. याचमुळे स्वत:ला पुन्हा घडविण्यासाठी अवघड मार्ग निवडला आहे असे अनुपम खेर यांनी म्हटले आहे.

वास्तविकता असलेल्या कहाणीचा दीर्घकाळापासून शोध होता. कहाणी सध्या एक रहस्य राहिल, परंतु  जेव्हा ती तुमच्यापर्यंत पोहोचेल, तेव्हा ती तुमच्यासोबत राहिल असा शब्द देतो असेही अनुपम यांनी म्हटले आहे. अनुपम खेर हे यापूर्वी 2025 मध्ये ‘तन्वी द ग्रेट’ या चित्रपटात दिसून आले होते. तर आता ते ‘फ्लिकर’ चित्रपटात दिसून येणार आहेत.

Advertisement

Advertisement

.