आज विलवडे श्री देव खांबलेश्वर मंदिराचा वर्धापन दिन सोहळा
11:29 AM Apr 30, 2026 IST | अनुजा कुडतरकर
Advertisement
विविध कार्यक्रमांचे आयोजन
Advertisement
ओटवणे : प्रतिनिधी
बांदा - दाणोली जिल्हा मार्गानजीक विलवडे येथे २२ वर्षांपूर्वी एका रात्रीत बांधण्यात आलेल्या श्री देव खांबलेश्वर मंदिराच्या वर्धापन दिन सोहळ्यानिमित्त आज गुरुवारी ३० एप्रिल रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त मंदिरात सकाळी ८ वाजता श्रींची पूजा व अभिषेक, सकाळी ९ वाजता श्री सत्यनारायण महापूजा, दुपारी १२ वाजता आरती व तीर्थप्रसाद, दुपारी १ वाजता महाप्रसाद, रात्री ८ वाजता ग्रामस्थांची भजने, रात्री ९:३० वाजता आरोलकर पारंपारिक दशावतार नाट्य मंडळ (वेंगुर्ले) यांचा रेणुका वध हा दशावतारी नाट्यप्रयोग होणार आहे. भाविकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन देव मर्यादा देवस्थान कमिटी आणि विलवडे ग्रामस्थ यांच्यावतीने करण्यात आले आहे.
Advertisement
Advertisement