द एंड ऑफ ओक स्ट्रीक’मध्ये ऐनी हॅथवे
चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित
ऐनी हॅथवे आणि इवान मॅकग्रेवर यांचा आगामी चित्रपट ‘द एंड ऑफ द ओक स्ट्रीट’चा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. यात रस्त्यांवरच नव्हे तर घराच्या कोपऱ्यांमध्येही दहशत दाखविण्यात आली आहे. ट्रेलरची सुरुवात ओक स्ट्रीटच्या रस्त्यांवर होत असलेल्या विध्वंसाच्या झलकपासून होते, जीव वाचविण्यासाठी लोक घरांबाहेर धावत असल्याचे यात दृश्य आहे. वॉर्नर ब्रदर्सचा हा चित्रपट ऑगस्ट महिन्यात प्रदर्शित होणार आहे.
एक रात्र, एक रहस्यमय घटना आणि ओक स्ट्रीटचे जग पूर्णपणे बदलले असल्याचे ट्रेलरमध्ये दाखविण्यात आले आहे. रात्री एक तीव्र अन् अजब प्रकाश दिसून येतो, कुणाला हा हेलिकॉप्टरचा प्रकाश असल्याचे वाटते तर काही जण याला यूएफओ ठरवू पाहतात.
ऐनी हॅथवे आणि ईवान मॅकग्रेगर यांच्या या चित्रपटात मैसी स्टेला आणि क्रिश्चिपन कॉनवे देखील महत्त्वाच्या भूमिकेत आहे. चित्रपटाचे लेखक अन् दिग्दर्शक डेव्हिड रॉबर्ट मिशेल आहेत. डेव्हिड रॉबर्ट मिशेल यांच्या टीममध्ये सिनेमेटोग्राफी दिग्दर्शन मायकल जियोलाकिस, प्रॉडक्शन डिझाइनर माया शिमोगुची, एडिटर जॉन एक्सलरेंड, संगीतकार मायकल जियाकिनो आणि कॉस्ट्यूम डिझाइनर एरिक बेनॅक सामील आहेत.