For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आण्णासाहेब जोल्ले यांचा भाजपकडून अर्ज दाखल

10:49 AM Apr 16, 2024 IST | Tarun Bharat Portal
आण्णासाहेब जोल्ले यांचा भाजपकडून अर्ज दाखल
Advertisement

चिकोडीसाठी आतापर्यंत 7 अर्ज : विजय निश्चित असल्याचा विश्वास

Advertisement

चिकोडी : चिकोडी लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या आज चौथ्या दिवशी भाजपाचे उमेदवार आण्णासाहेब जोल्ले यांनी सकाळी 10.30 वाजता मोजक्या आजी-माजी आमदारांसोबत जाऊन निवडणूक अधिकारी राहुल शिंदे यांच्याकडे उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी बोलताना आण्णासाहेब जोल्ले यांनी, देशात या लोकसभा निवडणुकीत पुन्हा भाजपाला बहुमत मिळणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार आहेत. चिकोडी लोकसभा मतदारसंघातून दुसऱ्यांदा आपला सलग विजय होणार असल्याची खात्री आहे. विकासाभिमुख कामे केल्यामुळेच भाजपकडे लोकांचा कल आहे. त्यामुळे भाजपाला देशात सर्वाधिक जागा मिळणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. लोकशाहीत मतदार सर्वश्रेष्ठ मानला जातो. त्यामुळे मतदानाचे महत्त्व ओळखून सर्वांनी मतदान करावे, असे आवाहनही त्यांनी केले. यावेळी आमदार दुर्योधन ऐहोळे, माजी आमदार श्रीमंत पाटील, माजी आमदार महेश कुमठळ्ळी, पी. एच. पुजार आदी उपस्थित होते.

सोमवारी तीन जणांचे चार उमेवारी अर्ज दाखल

Advertisement

चिकोडी लोकसभा मतदारसंघामध्ये सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या चौथ्या दिवशी भाजपकडून आण्णासाहेब जोल्ले यांचे दोन, एकसंबा येथील आप्पासाहेब कुरणे व अथणी येथील विलास मण्णूर यांचा प्रत्येकी एक असे चार उमेदवारी अर्ज निवडणूक अधिकारी राहुल शिंदे यांच्याकडे दाखल करण्यात आले. चिकोडी लोकसभा मतदारसंघासाठी पहिल्याच दिवशी 12 एप्रिल रोजी एकसंबा येथील आप्पासाहेब कुरणे, चिकोडी येथील मोहन मोटण्णवर तर हारुगेरी येथील शंभू कल्लोळकर या तिघांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. सोमवारी भाजपकडून आण्णासाहेब जोल्ले यांनी दोन उमेदवारी अर्ज दाखल केले. एकसंबा येथील आप्पासाहेब कुरणे व अथणी येथील विलास मण्णूर यांनी प्रत्येकी एक असे एकूण चार उमेदवारी अर्ज दाखल केले.

Advertisement
Tags :

.