For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अन्नपूर्णा योजनेचा बंगालमध्ये शुभारंभ

07:00 AM Jun 04, 2026 IST | Tarun Bharat Portal
अन्नपूर्णा योजनेचा बंगालमध्ये शुभारंभ
Advertisement

पहिल्या टप्प्यात 28.25 लाख महिलांना 3,000 रुपये हस्तांतरित

Advertisement

वृत्तसंस्था/कोलकाता

पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांनी बुधवारी महिलांसाठी अन्नपूर्णा योजनेचा शुभारंभ केला. या योजनेच्या पहिल्या टप्प्यात 28.25 लाख लाभार्थ्यांना 3,000 रुपयांची मासिक मदत देण्यात येणार आहे. ही बंगालमधील भाजप सरकारची एक महत्त्वाकांक्षी सामाजिक कल्याण योजना मानली जात आहे. योजनेच्या पहिल्या टप्प्यात बुधवारपासून लाभार्थ्यांच्या बँक खात्यात थेट 3,000 रुपये हस्तांतरित करण्यात आले. प्राथमिक अंदाजानुसार, या योजनेचा सुमारे 2 कोटी महिलांना लाभ मिळण्याची अपेक्षा आहे. तथापि, पहिल्या टप्प्यात केवळ 28.25 लाख महिलांनाच लाभ मिळेल. बंगालच्या पहिल्या भाजप सरकारच्या या अन्नपूर्णा योजनेच्या उद्घाटन सोहळ्याला मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांच्यासोबत महिला, बाल विकास आणि सामाजिक कल्याण मंत्री अग्निमित्रा पॉल यादेखील उपस्थित होत्या. या योजनेचा उद्घाटन सोहळा राज्यातील सर्व तालुके, नगरपालिका आणि कोलकाता महानगरपालिका क्षेत्रात व्हर्च्युअली देखील आयोजित करण्यात आला होता.

Advertisement

Advertisement
Tags :

.