Solapur News : वाळू तस्करी प्रकरणातील फरारी आरोपी अण्णा पाटील अखेर टेंभुर्णी पोलिसांच्या ताब्यात
वाळू तस्कर व धोकादायक गुन्हेगारावर टेंभुर्णी पोलिसांची प्रभावी कारवाई
टेंभुर्णी : टेंभुर्णी पोलीस ठाणे हद्दीतील मौजे शिराळ येथे राहणार अण्णासाहेब उर्फ अण्णा दिगंबर पाटील वय 34 वर्ष त्यांच्यावर वाळूचे संदर्भात दोन गुन्हे त्यामध्ये महसूल चे अधिकारी व कर्मचारी यांच्या वर हल्ला व खुणाचा प्रयत्न असे गुन्हे दाखल झाले होते.
अण्णा पाटील यांच्यावर प्रभावी प्रतिबंधक कारवाई करून देखील त्यांच्या वर्तनात सुधारणा होत नसल्याने टेंभुर्णी पोलीस ठाणे कडून महाराष्ट्र झोपडपट्टी दादा , हातभट्टी वाले, औषधी द्रव्य विषयक गुन्हेगार व धोकादायक व्यक्ती व वाळू तस्कर यांच्या विघातकृत्यांना आळा घालने बाबत अधिनियम सण 1981 कलम 3(१) प्रमाणे टेंभुर्णी पोलीस ठाणे प्रस्ताव क्रमांक 1/2025 प्रमाणे ची कागदपत्रे विलास रणदिवे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक व पोलीस हवालदार प्रदीप पर्वते यांनी तयार करून प्रस्ताव सादर केला होता.
त्यानुसार मा. पोलीस अधीक्षक सो सोलापूर ग्रामीण यांनी पोलीस ठाणे कडील प्रस्ताव मा.जिल्हाधिकारी सो, सोलापूर यांना सादर केले नंतर मा. जिल्हाधिकारी साहेब यांनी प्रस्तावाची पडताळणी करून प्रस्ताव योग्य कायद्याचे अटीचे पूर्तता होत असल्याने दिनांक 2/4/2025 रोजी अण्णा पाटील यांना येरवडा जेल येथे स्थानबद्ध करणेबाबत आदेश निर्गमित केले होते.
यातील अण्णा पाटील यांचा शोध घेऊनही तो मिळून येत नसल्याने मा.जिल्हाधिकारी सो सोलापूर ग्रामीण यांनी फरारी घोषित करणे संदर्भात कारवाई चालू केली होती. त्यामुळे पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी आरोपीचे शोध करता दोन पथके तयार केली होती.
दरम्यान पोलीस ठाणे हद्दीत जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचा प्रचाराची रंगत चालू असताना यातील आरोपी हा इंदापूर हद्दीत आली असल्याची गोपनीय माहिती मिळाल्याने पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी तात्काळ अण्णा पाटील यांच्या हातून कोणत्याही प्रकारे निवडणुक आचारसंहिते दरम्यान कायदा व सुव्यवस्थे चा प्रश्न निर्माण होऊ नये याकरिता फरारी आरोपी अटक करण्या करिता पोलीस ठाणे कडील पोलीस उपनिरीक्षक अजित मोरे, विलास रणदिवे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, पोलीस हवालदार संदीप गिरमकर यांना शोधकामी पाठविले होते.
अण्णा पाटील यांचा शोध कामी तांत्रिक विश्लेषण केले असत तो घेत गोकुळ हॉटेलचे जवळपास इंदापूर हद्दीत असल्याचे माहिती मिळून आल्याने त्याचा सापळा लावून त्यास ताब्यात घेऊन वैद्यकीय तपासणी करून त्यास अटक करून कागदपत्राचे तांत्रिक बाबी पूर्ण करून त्यास येरवडा सेंट्रल जेल पुणे येथे जमा करण्यात आले आहे..
सदर कामगिरी ही मा.अतुल कुलकर्णी ,पोलीस अधीक्षक , प्रीतम यावलकर, अपर पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण व मा. अंजना कृष्णा व्ही.एस. मॅडम, सहाय्यक पोलीस अधीक्षक, करमाळा उपविभाग करमाळा यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे.