एना केंड्रिक अन् ब्लेक लाइवली पुन्हा एकत्र
6 वर्षांनी होणार पुनरागमन
अमेझॉन एमजीएम स्टुडिओजने 2018 मधील हिट चित्रपट ‘अ सिम्पल फेवर’च्या दुसऱ्या भागाची घोषणा केली आहे. चित्रपटा एना केंड्रिक, ब्लेक लाइवली, हेन्री गोल्डिंग, एंड्रू रॅनल्स आणि बशीर सलाहुद्दीन हे कलाकार मुख्य भुमिकेत दिसून येतील. तर पॉल फीग याचे दिग्दर्शन करणार आहेत. पॉल यांनीच पहिल्या भागाचे दिग्दर्शन केले होते.
अ सिम्पल फेवर हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरला होता. जगभरात या चित्रपटात सुमारे 800 कोटी रुपयांची कमाई केली होती. डार्सी बेलच्या व्यक्तिरेखांना जेसिका शॉरजर यांनी पटकथेत स्थान मिळवून दिले होते.
चित्रपटात एनाने स्टेफनी स्मोदर्स ही व्यक्तिरेखा साकारली आहे. तर लाइवलीची भूमिका एमिली नेल्सनची आहे. दुसऱ्या भागात एमिलीचा विवाह दर्शविला जाणार आहे. इटलीच्या एका श्रीमंत उद्योजकाशी हा विवाह होत असल्याचे चित्रपटात दाखविण्यात येणार आहे. चित्रपटाचे चित्रिकरण लवकरच सुरू होणार आहे. हा चित्रपट प्राइम व्हिडिओवर प्रदर्शित केला जाणार आहे.
एना केंड्रिक ही ऑस्करचे नामांकन प्राप्त अभिनेत्री, निर्माती आणि दिग्दर्शिका आहे. तसेच न्यूयॉर्क टाइम्सची बेस्ट सेलिंग लेखिका देखली नाहे. नेटफ्लिक्सचा चित्रपट वुमन ऑफ द ऑवरद्वारे ती दिग्दर्शकीय पदार्पण करणरा आहे. या चित्रपटाची निर्मिती करण्यासह ती मुख्य भूमिकेत देखील आहे. ब्लेक लाइवली हॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री असून तिने अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. यात द एज ऑफ एडेलीन हा चित्रपट सर्वात चर्चेत राहिला आहे.