For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची प्रकृती बिघडली; मुंबईतील बॉम्बे हॉस्पिटलच्या ICU मध्ये दाखल

11:23 AM Sep 01, 2026 IST | Tarun Bharat Portal
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची प्रकृती बिघडली  मुंबईतील बॉम्बे हॉस्पिटलच्या icu मध्ये दाखल
Advertisement

अहिल्यानगर : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांना पुढील उपचारासाठी मुंबईतील प्रसिद्ध बॉम्बे हॉस्पिटलच्या अतिदक्षता विभागात (ICU) दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळत असून, डॉक्टरांचे विशेष पथक त्यांच्या प्रकृतीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे.

Advertisement

अण्णा हजारे यांना गेल्या काही दिवसांपासून प्रचंड खोकला, तीव्र ताप, अशक्तपणा तसेच शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होणे यांसारख्या त्रासांचा सामना करावा लागत होता. स्थानिक पातळीवर उपचार सुरू असतानाही त्यांच्या प्रकृतीत अपेक्षित सुधारणा होत नव्हती.

त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून त्यांना तातडीने मुंबईला हलविण्याचा निर्णय घेण्यात आला. मुंबईतील बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल केल्यानंतर डॉक्टरांकडून त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले आहेत. त्यांच्या प्रकृतीवर वैद्यकीय पथक सतत लक्ष ठेवून आहे.

Advertisement

अण्णा हजारे यांच्या प्रकृतीची माहिती समोर आल्यानंतर त्यांच्या समर्थकांमध्ये आणि चाहत्यांमध्ये चिंता निर्माण झाली आहे. दरम्यान, त्यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याचे सांगण्यात येत असून, उपचारांना ते कसा प्रतिसाद देत आहेत याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Advertisement
Tags :

.