For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

"माझा झुरळ जनता पार्टीला"...ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी स्पष्टच केलं

05:33 PM May 25, 2026 IST | RAHUL SADOLIKAR
 माझा झुरळ जनता पार्टीला    ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी स्पष्टच केलं
Advertisement

देशाचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या वक्तव्यानंतर अस्तित्वात आलेला झुरळ जनता पक्ष (CJP) सोशल मीडियावरील बंदी, कायदेशीर वाद आणि राजकीय वक्तृत्वामुळे चर्चेत राहिला आहे. या पक्षाविरोधात सर्वोच्च न्यायालयात एक जनहित याचिका दाखल करण्यात आली असून, त्यात या आंदोलनाच्या सीबीआय चौकशीची मागणी करण्यात आली आहे.

Advertisement

या सगळ्यात, देशात भ्रष्टाचाराविरोधात आंदोलनाचे नेतृत्व करणारे सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनीही आपली प्रतिक्रिया दिली आहे. अण्णा हजारे यांनी सरकारला इशारा देत म्हटले आहे की, तरुणांचा आवाज दाबणे चुकीचे आहे. त्यांनी झुरळ जनता पक्षाला पाठिंबा दिला आहे.

अण्णांवर सोशल मिडीयावर टीका

Advertisement

लोकपाल आंदोलनानंतर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी राष्ट्रीय पातळीवरील कोणतंही आंदोलन हाती घेतलं नाही. त्यामुळे सोशल मिडीयावर अण्णा हजारेंविरोधात अनेकदा टीका करण्यात येते. आता मात्र अण्णांनी कॉक्रोच जनता पार्टीच्या स्थापनेवर आपलं मत व्यक्त केलं आहे.

अण्णा हजारे काय म्हणाले?

' झुरळ जनता पार्टी ' (CJP) च्या नावाखाली वाढत असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर , अण्णा हजारे यांनी रविवारी या चळवळीला उघडपणे पाठिंबा दिला. ऑनलाइन सुरू झालेल्या तरुणांच्या या अनोख्या चळवळीला अप्रत्यक्षपणे पाठिंबा देताना, त्यांनी सरकारला स्पष्ट इशारा दिला की, युवाशक्ती हीच राष्ट्राची शक्ती आहे.

त्यांचा आवाज दाबणे किंवा त्याकडे दुर्लक्ष करणे प्रशासनासाठी हानिकारक ठरू शकते. हजारे म्हणाले की, जरी या मोहिमेचे नाव 'झुरळ पार्टी' ठेवले असले, जे ऐकायला कदाचित चांगले वाटत नसेल, तरी देशातील मोठी तरुण पिढी या चळवळीच्या पाठीशी उभी आहे. अण्णा हजारे म्हणाले की, त्यामुळे या चळवळीला 'झुरळ' म्हणण्यामागे काय हेतू होता, हे व्यवस्थेला समजून घ्यावे लागेल.

अण्णा हजारे यांनी आंदोलनाचा इशारा दिला.

अण्णा हजारे यांनी कॉकरोच जनता पार्टीवर आपले मत व्यक्त करताना, भ्रष्टाचाराविरोधात मोठ्या आंदोलनाचे संकेत पुन्हा एकदा दिले आहेत. ते म्हणाले की, केंद्रात लोकपाल कायदा आणि राज्यांमध्ये लोकायुक्त कायदा लागू झाला असला तरी, त्यांची अंमलबजावणी योग्य प्रकारे होत नाही.

तरुणांमधील ही नाराजी पाहून अण्णा म्हणाले की, देशातील भ्रष्टाचार संपवण्यासाठी आणि कायदा व सुव्यवस्था पुनर्संचयित करण्यासाठी आपल्याला पुन्हा एकदा आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल असे दिसते. विशेष म्हणजे , कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दीपके हे मूळचे महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) येथील आहेत. इंस्टाग्रामवर कॉकरोच जनता पार्टीच्या फॉलोअर्सची संख्या २ कोटी २८ लाखांपर्यंत वाढली आहे.

Advertisement

.